Surya Grahan 2025: पुजाऱ्याच्या घरात कपड्यांना लागतेय आपोआप आग,अहिल्यानगरमध्ये भयानक घटना
- Published by:sachin Salve
- Reported by:Harish Dimote
Last Updated:
अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. एका पुजाऱ्याच्या घरात अचानक अग्नितांडव सुरू झालं आहे. घरातील साहित्यांना अचानक आग लागतेय.
advertisement
1/9

अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. एका पुजाऱ्याच्या घरात अचानक अग्नितांडव सुरू झालं आहे. घरातील साहित्यांना अचानक आग लागतेय. महिला, लेकरांच्या कपडे आपोआप पेट घेत आहे. धक्कादायक म्हणजे, काही दिवसांपूर्वी या पुजाऱ्याच्या घरावर आधी दगड पडत होती, आता अचानक आगीच्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. पुजारी कुटुंबीय प्रचंड दहशतीखाली आहे.
advertisement
2/9

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील पुजारी मोहन केशव यांच्या घरी हा प्रकार घडला आहे. पुजारी कुटुंबीयांच्या घरातील वस्तू आपोआप पेटत असून या घटनेमुळे कुटुंबीय धास्तावलं आहे.
advertisement
3/9
मोहन केशव यांच्या घरावर गेल्या काही दिवसांपासून दगड फेकले जात होते. कुणी तरी खोडसाळपणा करत आहे म्हणून त्यांनी घराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. कॅमेरे लावल्यानंतर काही दिवसांनी हा प्रकार बंद झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला. पण हा प्रकार बंद होत नाही तेच अचानक घरात अग्नितांडव सुरू झालं.
advertisement
4/9
घरात कुठेही ज्वलनशील पदार्थ नाही, कुठे कापूर टाकलेला नाही. तरीही अचानक घरातील साहित्यांना आग लागायला लागली. आता घरातील कपडे आणि प्लॅस्टिकच्या वस्तू आपोआप पेट घेत असल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे केशव कुटुंबीयांनी घरातील सगळं साहित्य बाहेर रस्त्यावर टाकलं आहे. तिथेच हे कुटुंब राहत आहे. पण घरात कुणाही जात नाही.
advertisement
5/9
मोहन केशव यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की, महिन्यापूर्वी आमच्या घरावर दगडं येत होती. कॅमेरा लावला त्यानंतर ते बंद झाले. आता घरात साहित्यांना आग लागायला लागली, आम्ही बाहेर असलो की घरातील साहित्याला आपोआप आग लागते. साड्या, गोधड्या, पोरांची कपडे, प्लॉस्टिकच्या वस्तू सगळ्यांना आग लागते. अचानक पेट घेतो."
advertisement
6/9
कधी घडला पहिली प्रकार? "शुक्रवारी साडे तीन वाजता हा प्रकार पहिल्यांदा घडला. त्यानंतर दिवसभर हा प्रकार सुरूच होता. त्यानंतर रात्रभर हा प्रकार आणखी वाढला. शुक्रवारपासून आधी आमच्या घरात आग लागलण्याचा प्रकार घडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या चुलत्याच्या घरी सुद्धा आग लागण्याचा प्रकार सुरू झाला. त्यानंतर घरापासून दूर अंतरावर असलेल्या घरांमध्ये हा प्रकार घडायला लागला. अशा तीन घरांमध्ये आग लागण्याचा प्रकार घडला आहे. ही आग कशामुळे लागली, कुणी लागली काहीच कळेना. आमचं मात्र प्रचंड नुकसान झालं आहे.
advertisement
7/9
ही बातमी म्हणता म्हणता गावात वाऱ्यासारखी पसरली. गावातील स्थानिक लोक आणि पोलीस केशव यांच्या घरी पोहोचले. तेव्हा हा प्रकार पाहून तेही हादरले.
advertisement
8/9
मोहन मोहन केशव इथं यांच्या घरामध्ये कपडे आपोआप आग लागायला लागली. आधी घरावर दगड येत होती. पण हा प्रकार थांबला. त्यानंतर आता घरात आग लागण्याचा प्रकार घडतोय. हे पुजारी कुटुंबीय दहशतीखाली आहे. त्यांनी सगळं साहित्य बाहेर काढलं आहे. आधी आम्हालाही विश्वास बसला नाही. पण आम्ही इथं पाहण्यासाठी आलो तेव्हा आमच्या डोळ्यादेखत कपड्यांना आग लागली. हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे की दुसरं काही याचा शोध लागला पाहिजे, अशी मागणी स्थानिक रहिवाशी दिलीप देसाई यांनी केली.
advertisement
9/9
आता हा सर्व प्रकार नेमका आहे काय? दहशत निर्माण करण्यासाठी कुणी करत आहे का ? की इतर काही प्रकार आहे या विचाराने कुटुंबीय धास्तावले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत काही नमुने तपासणीसाठी पाठवले असून लवकरच याचा छडा लावावा अशी मागणी होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Surya Grahan 2025: पुजाऱ्याच्या घरात कपड्यांना लागतेय आपोआप आग,अहिल्यानगरमध्ये भयानक घटना