भिवंडीला मुसळधार पावसाचा तडाखा; जनजीवन विस्कळीत, रस्ते बनले नद्या, पहिले Photos
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
भिवंडी शहराला मुसळधार पावसानं चांगलाच तडाखा दिला आहे, रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.
advertisement
1/7

भिवंडी शहराला मुसळधार पावसानं चांगलाच तडाखा दिला आहे, रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात दोन फुटांपर्यंत पाणी साचलं आहे.
advertisement
2/7
भिवंडी शहरातील तीन बत्ती, भाजी मार्केट, बाजारपेठ, कल्याण नाका, पटेल नगर, कमला हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे.
advertisement
3/7
सखल भागात पाणी साचल्यामुळे भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. अनेकजण पाण्यामधून घरी जाण्यासाठी वाट काढत आहेत .
advertisement
4/7
तर दुसरीकडे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अनेक वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असून, वाहतूक विस्कळीत झाली आहे.
advertisement
5/7
रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे, जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे
advertisement
6/7
दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
7/7
हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पाऊस झाल्यास भिवंडीमधील सखल भागात पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ठाणे/
भिवंडीला मुसळधार पावसाचा तडाखा; जनजीवन विस्कळीत, रस्ते बनले नद्या, पहिले Photos