मराठी माणसाने ब्रिटिशांकडून बांधून घेतला पूल, 96 वर्षांपासून आजही मजबूत, तुम्हाला माहितीये हा कुठे?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
कृष्णा नदीला सन 1914 आणि सन 1916 साली प्रलयकारी महापूर आला होता. त्यानंतर सांगलीचे संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांनी कृष्णा नदीवर पूल उभारण्याचा निर्णय घेतला. या बाबतीत त्यावेळच्या सांगली स्टेट असेंम्बली मध्ये चर्चा घडवून आणली आणि निधी जमवून या पूल उभारणीला 14 फेब्रुवारी 1927 मध्ये प्रत्यक्ष सुरूवात झाली.
advertisement
1/7

स्वातंत्र्यपूर्व काळापासून सांगलीकरांच्या सेवेत असलेला कृष्णा नदीवरील आयर्विन पूल होय. सांगलीला एक समृद्ध शहर बनवण्याचा "आयर्विन पूल" हा राजमार्ग ठरला. आज मोठ्या दिमाखात सांगलीच्या वैभवात भर घालणाऱ्या या आयर्विन पुलाला 96 वर्ष पूर्ण झाली आहेत. कृष्णा ही भारतातील प्रमुख नदी. या नदीला वारणा, पंचगंगा, दूधगंगा, येरळा, अग्रणी, कुडाळी, वेणा, कोयना, मोरणा, कडवी शाली, कासरी, गरवाली अशा कित्येक उपनद्या मिळतात.
advertisement
2/7
कृष्णा नदीला सन 1914 आणि सन 1916 साली प्रलयकारी महापूर आला होता. त्यानंतर सांगलीचे संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांनी कृष्णा नदीवर पूल उभारण्याचा निर्णय घेतला. या बाबतीत त्यावेळच्या सांगली स्टेट असेंम्बली मध्ये चर्चा घडवून आणली आणि निधी जमवून या पूल उभारणीला 14 फेब्रुवारी 1927 मध्ये प्रत्यक्ष सुरूवात झाली. ब्रिटिश आधिपत्याखाली जरी या पुलाला मान्यता मिळाली असली तरी, याचे सर्व नियंत्रण हे तत्कालीन सांगली संस्थानचे पटवर्धन सरकारांच्या आधिपत्याखाली होते.
advertisement
3/7
पुलाच्या बांधकामाचे कंत्राट पुण्यातील रानडे अँण्ड सन्स कंपनीकडे होते. सांगली शहरातील काळा दगड, कर्नाटकातील गोकाक येथील लाल दगड आणि शिसे याचा वापर करून हा पूल बांधण्यात आला. पूल उभारताना यावर रेखीव आणि देखण्या रुपाची हस्तकलाही करण्यात आली. 13 कमानींच्या जोरावर उभा राहिलेला हा भव्य दिव्य पुल, अखेर दोन वर्ष, नऊ महिन्यांनी म्हणजे 18 नोव्हेंबर 1929 मध्ये सर्वार्थाने पूर्ण होऊन वाहतूकीसाठी खुला झाला.
advertisement
4/7
त्याकाळी या पुलाच्या निर्मितीसाठी 6 लाख 50 हजार रुपये इतका खर्च आला.18 नोव्हेंबर 1919 रोजी हिंदुस्थानचे व्हॉइसराय एडवर्ड फेड्रिक लिंडलेवुड यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन झाले होते. तशी कोनशिला पुलावर अजूनही सुस्थितीत आहे. त्यांना बॅरेन आयर्विन ऑफ कर्बी अंडरडेल ही पदवी होती. आणि या पदवीवरून सांगली संस्थानकडून या पुलाला "आयर्विन" हे नाव देण्यात आले.
advertisement
5/7
सांगलीच्या विकासाला चालना देणाऱ्या या पुलाने पुण्याचा थेट प्रवास सुकर केला. व्यापाराला चालना मिळाली. पूर्वी कोल्हापूरमार्गे पुण्याला जावे लागत असे. पुण्यातील मेसर्स व्ही. आर. रानडे अंण्ड सन्स या बांधकाम कंपनीने पूल बांधल्याची आणि सांगली संस्थानचे मुख्य अभियंता भावे हे कामाचे प्रमुख असल्याची नोंद कोनशिलेवर आहे.
advertisement
6/7
17 फेब्रुवारी 1927 रोजी सांगलीचे अधिपती चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन यांनी पुलाचा पाया रचला. 96 वर्षाचा प्रवास एकट्याने केल्यानंतर आता त्याच्या जोडीला नवा समांतर पूल आला आहे. त्यामुळे आयर्विन पूल आता वाहतुकीचा भार नव्या पुलावर टाकून निवृत्तीच्या वाटचालीवर आहे.
advertisement
7/7
पुलाच्या आधी याठिकाणी व्यापारास मर्यादा होत्या. पण आयर्विन पुलाच्या निर्मितीमुळे सांगलीकडे व्यापाराचा नवा मार्ग सुरू झाला आणि सांगली हे एक व्यापारी केंद्र बनले. शतकी वाटचालीतही मजबुतीला तसूभरही तडा न गेलेला हा पूल स्थापत्य शैलीच्या दृष्टीने अभिमानाचा उत्कृष्ट नमुना ठरला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
मराठी माणसाने ब्रिटिशांकडून बांधून घेतला पूल, 96 वर्षांपासून आजही मजबूत, तुम्हाला माहितीये हा कुठे?