TRENDING:

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रशासन सतर्क

Last Updated:
धमकीचा मेल प्राप्त होताच जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज काही काळासाठी थांबवण्यात आले.
advertisement
1/7
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रशासन सतर्क
अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
2/7
या धमकीनंतर तातडीने सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली.धमकीचा मेल प्राप्त होताच जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज काही काळासाठी थांबवण्यात आले.
advertisement
3/7
कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेर काढून एका ठिकाणी एकत्र करण्यात आले. त्यानंतर बॉम्बशोधक व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण कार्यालयाची सखोल तपासणी सुरू आहे.
advertisement
4/7
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना परिसरात ये-जा करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
advertisement
5/7
आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, तपास पूर्ण होईपर्यंत सर्व खबरदारी घेतली जात आहे.
advertisement
6/7
दरम्यान, हा धमकीचा मेल कोणी व कोणत्या उद्देशाने पाठवला याचा तपास सायबर सेल व पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
advertisement
7/7
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रशासन सतर्क
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल