TRENDING:

'धुरंधर'मुळे फळफळलं TV Stars चं नशीब, छोट्या पडद्यावरील कलाकारांनी गाजवली Silver Screen, कोण आहेत ते?

Last Updated:
TV Stars in Dhurandhar: या चित्रपटाच्या अफाट यशामागे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील ६ गाजलेले चेहरे आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाने मोठ्या पडद्यावरही प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या आहेत.
advertisement
1/8
धुरंधरने बदललं TV Starsचं नशीब,छोट्या पडद्यावरील कलाकारांनी गाजवली Silver Screen
मुंबई: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट सुटला असून त्याने कमाईचे सर्व जुने रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत. रणवीर सिंगचा स्वॅग आणि अक्षय खन्नाचा थरारक अभिनय यांची चर्चा तर जगभर सुरूच आहे, पण या चित्रपटाच्या अफाट यशामागे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील ६ गाजलेले चेहरे आहेत, ज्यांनी आपल्या कसदार अभिनयाने मोठ्या पडद्यावरही प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या आहेत.
advertisement
2/8
५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या स्पाय-थ्रिलरमध्ये केवळ बॉलिवूडचे दिग्गजच नाही, तर आपल्या घरात दररोज दिसणाऱ्या कलाकारांनीही 'धुरंधर' कामगिरी केली आहे. चला तर मग, पाहूया कोणत्या टीव्ही स्टार्सनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
advertisement
3/8
'भाभीजी घर पर हैं!' मधून अनिता भाभी म्हणून घराघरात पोहोचलेली सौम्या टंडन या चित्रपटात चक्क 'उल्फत'च्या भूमिकेत दिसत आहे. खतरनाक रहमान डकैत (अक्षय खन्ना) याच्या पत्नीची भूमिका तिने जबरदस्त साकारली आहे. तिची ही भूमिका सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
advertisement
4/8
'जस्सी जैसी कोई नहीं' फेम गौरव गेरा हा नेहमी आपल्याला हसवताना दिसला आहे. मात्र, 'धुरंधर'मध्ये त्याने चक्क मोहम्मद आलम या अंडरकवर पात्राची भूमिका साकारून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ही भूमिका त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा सरप्राईज पॅकेज ठरली आहे.
advertisement
5/8
राकेश बेदी हे टीव्ही विश्वातील असे नाव आहे, जे गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. आदित्य धर यांच्यासोबत त्यांनी 'उरी'मध्येही काम केलं होतं. 'धुरंधर'मध्ये एका राजकारण्याची भूमिका त्यांनी अशा काही ताकदीने साकारली आहे की, त्यांच्या अनुभवाचं दर्शन प्रत्येक फ्रेममध्ये घडतं.
advertisement
6/8
सिनेमात आर. माधवनच्या सोबतीने रणनीती आखणारा 'सुशांत बन्सल' म्हणजे आपला लाडका मानव गोहिल. जरी तो मुख्य भूमिकेत नसला, तरी कथेला पुढे नेण्यासाठी त्याचं पात्र अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचा सहज अभिनय प्रेक्षकांना खूप भावला आहे.
advertisement
7/8
चित्रपटातील 'शरारत' हे गाणं सध्या युट्यूबवर ट्रेंडिंगमध्ये आहे. या गाण्यात क्रिस्टल डिसूजा आणि आयशा खान यांनी आपल्या डान्सने आणि स्क्रीन प्रेझेन्सने आग लावली आहे. गाण्यात या दोघींनी ग्लॅमरचा जो तडका दिलाय, तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
advertisement
8/8
'धुरंधर'ने अवघ्या १४ दिवसांत भारतात ४६०.२५ कोटींचा नेट गल्ला जमवला आहे. जगभरातील कमाईचा विचार करता, हा चित्रपट आज ७०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे. ज्या वेगाने प्रेक्षक थिएटर्सकडे धाव घेत आहेत, ते पाहता या आठवड्याच्या शेवटी चित्रपट ८०० कोटींचा टप्पा आरामात पार करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'धुरंधर'मुळे फळफळलं TV Stars चं नशीब, छोट्या पडद्यावरील कलाकारांनी गाजवली Silver Screen, कोण आहेत ते?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल