जिल्हा परिषद शाळेमध्ये फुलली सुंदर परसबाग; विद्यार्थ्यांना दिले जातायत शेतीचे धडे PHOTOS
- Published by:News18 Marathi
Last Updated:
या परसबागेमधून विद्यार्थ्यांना शेतीविषयक आणि भविष्यवेधी शिक्षण देऊन सक्षम बनवण्याचा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
advertisement
1/7

विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या पलीकडे वेगवगेळ्या उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण देण्याची आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात येणाऱ्या लिंगापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये परसबाग तयार करण्यात आली आहे. यामधून विद्यार्थ्यांना शेतीविषयक आणि भविष्यवेधी शिक्षण देऊन सक्षम बनवण्याचा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
advertisement
2/7
आष्टी तालुक्यात लिंगापूर येथील जि. प. प्राथमिक शाळेत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या परिश्रमातून प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान अंतर्गत सुंदर परसबाग तयार करण्यात आली आहे.
advertisement
3/7
या परसबागेत पालक, मेथी, कोथिंबिर, वांगी, टोमॅटो, मुळा, लवकी, गाजर, काकडी, फुलकोबी, मिरची अशा एकूण 21 प्रकारच्या देशी वाणाची परसबागेत लागवड करण्यात आलीय.
advertisement
4/7
सर्व प्रकारच्या भाज्यांचा उपयोग शालेय पोषण आहारात करण्यात येत असल्यामुळे मुलांना विषमुक्त भाजीपाला उपलब्ध होण्यास मदत होत आहे. या उपक्रमामुळे मुलांना नैसर्गिक शेतीचे धडे मिळत असून, शेतीविषयक नवनवीन तंत्राची माहिती मिळत आहे.
advertisement
5/7
अनुषंगाने लहानआर्वी ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील साबळे यांनी लिंगापूर येथील प्राथमिक शाळेत येऊन परसबागेची पाहणी केली. परसबाग उपक्रमात आष्टी तालुक्यात लिंगापूर शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला असल्याने शाळेतील मुख्याध्यापक नीलेश इंगळे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
advertisement
6/7
परत बागेला लागणाऱ्या बियाण्यांची निर्मिती देखील शाळेतच केली जात असून बाजारातून कोणतेही बियाणे विकत आणले जात नाहीत. शाळेतच रोपे तयार करून परत बागेत लावली आहेत.
advertisement
7/7
या झाडांना पोषक घटक देण्यासाठी सेंद्रिय आणि कंपोस्ट खतांची निर्मिती उपक्रमाच्या माध्यमातून शाळेमध्येच केली जात असून विद्यार्थी ही त्याच्या माध्यमातून निरनिराळ्या गोष्टी शिकत आहेत, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक निलेश इंगळे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ वर्धा/
जिल्हा परिषद शाळेमध्ये फुलली सुंदर परसबाग; विद्यार्थ्यांना दिले जातायत शेतीचे धडे PHOTOS