Weather Update: शेवटचा आठवडा रडवणार थंडीनं गारठणार, 5 जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा, हवामान विभागाने दिला अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Weather Update: उत्तर भारतातील धुक्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात 23 ते 26 डिसेंबरदरम्यान तापमान 2 ते 3 अंशांनी घसरणार असून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार आहे.
advertisement
1/6

उत्तर भारतात सध्या दाट धुक्याची चादर पसरली आहे, कडाक्याची थंडी आणि काही भागांत तीव्र थंडीची लाट अशी परिस्थिती आहे. त्याचा थेट नाही मात्र काही अंशी परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावरही दिसू लागणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, 23 ते 26 डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता असून किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सियसची घसरण होऊ शकते.
advertisement
2/6
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात या कालावधीत कोणत्याही ठिकाणी मुसळधार किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाही. मात्र उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे सकाळ आणि रात्रीच्या वेळी गारवा लक्षणीय वाढणार आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी अधिक जाणवू शकते.
advertisement
3/6
अति थंडीमुळे दवबिंदू पहाटेच्या सुमारास पडू शकतात. त्याचा परिणाम फळांवर होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील 24 तासांत राज्यातील तापमानात फारसा बदल होणार नाही. मात्र 24 डिसेंबरपासून किमान तापमानात घट सुरू होईल आणि पुढील दोन दिवसांत म्हणजे 25 आणि 26 डिसेंबरदरम्यान तापमान 2 ते 3 अंशांनी खाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी थंडी अधिक तीव्र जाणवू शकते.
advertisement
4/6
उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहारसह उत्तर भारतातील अनेक राज्यांत घनदाट कोहरा आणि शीत दिवसाची स्थिती कायम आहे. महाराष्ट्रात सध्या घनदाट कोहऱ्याची थेट चेतावणी नसली तरी, उत्तर भारतातील हवामान प्रणालींचा प्रभाव म्हणून थंड वारे आणि तापमानातील घसरण अनुभवायला मिळणार आहे.
advertisement
5/6
थंडी वाढत असल्याने शेतकऱ्यांनी पिकांवर विशेष लक्ष ठेवावे. भाजीपाला आणि फळबागांमध्ये सकाळच्या थंडीचा परिणाम होऊ शकतो. नागरिकांनीही सकाळी लवकर बाहेर पडताना योग्य उबदार कपडे वापरण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. सध्या राज्यासाठी कोणतीही तीव्र हवामान चेतावणी जारी करण्यात आलेली नाही.
advertisement
6/6
26 डिसेंबरनंतर तापमानात फार मोठा बदल अपेक्षित नाही. मात्र थंडीचे हे वातावरण काही दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ख्रिसमस आणि वर्षअखेरीस महाराष्ट्रात गुलाबी थंडीचा अनुभव घेता येईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Weather Update: शेवटचा आठवडा रडवणार थंडीनं गारठणार, 5 जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा, हवामान विभागाने दिला अलर्ट