Mumbai Pune Highway : जुना मुंबई पुणे हायवेवरुन जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 3 दिवस या वाहनांना बंदी
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Mumbai Pune Highway : तुम्ही जर जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरुन जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. (गमेश दुडम, प्रतिनिधी)
advertisement
1/5

भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकवीरा देवीचा चैत्र पालखी सोहळा आज कार्ला गडावर रंगणार आहे. पालखी मिरवणुकीची व यात्रेची सर्व तयारी श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.
advertisement
2/5
आई एकवीरा देवीचे माहेरघर असलेल्या देवघर या ठिकाणी आई एकविरेचा भाऊ काळ भैरवनाथ यांचा पालखी मिरवणूक सोहळा पार पडला. कोकण भागातून येणाऱ्या आई एकवीरा देवीच्या पालख्या या देवघरांमध्ये येऊन काळ भैरवाची भेट घेत त्या ठिकाणी वाजत गाजत मिरवणूक काढत कार्ला गडावर दुपारनंतर येणार आहे तर आई एकविरा देवीचा मानाचा पालखी मिरवणुकीचा सोहळा सायंकाळी सात वाजता कार्ला गडावर होणार आहे.
advertisement
3/5
याची सर्व तयारी पूर्ण झाली असून श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने चैत्र यात्रेनिमित्त आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुलभ दर्शनाला प्राधान्य देण्यात आले आहे.
advertisement
4/5
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी एकविरा देवीच्या गडावर तसेच पायऱ्या मार्गावर व कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान महामार्गावर कोठेही वाहतूक कोंडी होणार नाही तसेच येणाऱ्या भाविकांना व पालखी घेऊन येणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.
advertisement
5/5
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर तीन दिवस अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. आगरी कोळी बांधव मोठ्या संख्येने कार्ला गडावर येत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या तयारीवर भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Pune Highway : जुना मुंबई पुणे हायवेवरुन जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 3 दिवस या वाहनांना बंदी