Mumbai Crime: मैत्रिणीला खूश करण्यासाठी चोरायचा स्कूटी; पेट्रोल संपलं की तिथेच सोडायचा अन्.., धक्कादायक कांड
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
विजय वंजारा/मुंबई 26 ऑगस्ट : बोरिवली पोलिसांनी एका सराईत स्कूटी चोराला अटक केली आहे. जो काही मिनिटांत स्कूटी चोरून पळून जायचा. बोरिवली पोलिसांनी आरोपीकडून 6 स्कूटी जप्त केल्या आहेत.
advertisement
1/7

प्रेयसीला खूश करण्यासाठी आरोपी रोज नवीन अॅक्टिव्हा चोरायचा. जेणेकरून तो मुलीसोबत हँगआउट करू शकेल.
advertisement
2/7
जिथे स्कूटीचं पेट्रोल संपायचं, तिथेच तो ती स्कूटी सोडून द्यायचा आणि दुसरी स्कूटी चोरून पळून जायचा.
advertisement
3/7
बोरीवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्कूटी चोरीच्या घटना वाढत होत्या. बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला.
advertisement
4/7
सीसीटीव्ही आणि सूत्रांच्या मदतीने आरोपी मालाड परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बोरिवली पोलिसांनी एक पथक तयार करून आरोपीला मालाड येथून अटक केली.
advertisement
5/7
आरोपीकडून 6 अक्टिव्हा जप्त करण्यात आल्या. बोरिवली पोलिसांनी बोरिवली, दहिसर, चारकोप आणि कस्तुरबा येथे 6 गुन्हे शोधले आहेत.
advertisement
6/7
अनिल भीमराव निंबाळकर (23 वर्षे) असं आरोपीचं नाव आहे. तो मालवणी येथील रहिवासी असून मेकॅनिकचं काम करतो.
advertisement
7/7
तो आपल्या मैत्रिणीला खूश करण्यासाठी स्कूटी चोरायचा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Crime: मैत्रिणीला खूश करण्यासाठी चोरायचा स्कूटी; पेट्रोल संपलं की तिथेच सोडायचा अन्.., धक्कादायक कांड