मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रवाशांनी भरलेल्या बसला भीषण आग; ट्रॅव्हल्स जळून खाक
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला आहे, प्रवाशांनी भरलेल्या धावत्या बसने अचानक पेट घेतला.
advertisement
1/7

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला आहे, प्रवाशांनी भरलेल्या धावत्या बसने अचानक पेट घेतला.
advertisement
2/7
खासगी बसला एक्स्प्रेस वे वर अचानक आग लागली, सुदैवानं आगीची घटना वेळीच लक्षात आल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे.
advertisement
3/7
बसनं पेट घेतल्याचं लक्षात येताच बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या खाली उतरवण्यात आलं, या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
advertisement
4/7
ही बस मुंबईहून पुण्याकडे येत असताना ही घटना घडली आहे, या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली.
advertisement
5/7
दरम्यान घटनेची माहिती मिळताच खोपोली,टाटा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या
advertisement
6/7
आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे, मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली.
advertisement
7/7
बसने एक्स्प्रेस वे वरच पेट घेतल्यामुळे याचा मोठा परिणाम हा वाहतुकीवर देखील झाला, काही काळ या परिसरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रवाशांनी भरलेल्या बसला भीषण आग; ट्रॅव्हल्स जळून खाक