पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर मृतदेहांचा खच अन् रक्ताचा सडा, विठ्ठलाच्या भेटीची इच्छा अधुरीच राहिली, काळजाचा थरकाप उडवणारे Photos
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मोठी बातमी समोर आली आहे. पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये 54 प्रवाशी होते.
advertisement
1/7

मोठी बातमी समोर आली आहे. पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून 49 जण जखमी झाले आहेत.
advertisement
2/7
जखमी भाविकांपैकी सात ते आठ जणांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
3/7
मध्य रात्री एकच्या सुमारास मुबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पनवेल तालुक्याच्या हद्दीमध्ये हा अपघात घडला आहे. अपघातग्रस्त वाहनातील सर्व प्रवासी हे डोंबिवली, नीलजे लोढा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
4/7
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुबई पुणे एक्स्प्रेस वे वर पनवेल तालुका हद्दीत पंढरपूर येथे जाणाऱ्या बसला रात्री एकच्या सुमारास भीषण अपघात झाला असून बसमध्ये 54 प्रवाशी होते. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला असून 49 जणांवर उपचार सुरू आहे.
advertisement
5/7
मुंबई पुणे एक्स्प्रेसवर रात्री एकच्या सुमारास पंढरपूरला जाणाऱ्या बसची धडक एका ट्रॅक्टरला झाल्याने बस थेट रस्त्याच्या खाली पलटी झाली, अशी माहिती नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
advertisement
6/7
सर्व प्रवाशी डोंबिवली निळजे येथील असल्याची माहिती समोर आली असून, घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
7/7
दरम्यान हे सर्व भाविक वारीनिमित्त पंढरपूरला चालले होते. मात्र वाटेतच बसचा भीषण अपघात झाला आहे, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर मृतदेहांचा खच अन् रक्ताचा सडा, विठ्ठलाच्या भेटीची इच्छा अधुरीच राहिली, काळजाचा थरकाप उडवणारे Photos