TRENDING:

Lalbaug Accident : कोरोनात बाबांचं निधन, कुटुंबाची जबाबदारी पेलली; लालबाग अपघातात मृत्यूने संसाराचं स्वप्नही राहिलं अपुरं

Last Updated:
लालबागमध्ये झालेल्या बस अपघातात २८ वर्षीय नुपुरा मणियार हिचा मृत्यू झाला. दिवाळीत तिचं लग्न होणार होतं, मात्र त्याआधीच अपघाताने तिचं संसाराचं स्वप्न अधुरं राहिलं.
advertisement
1/5
कोरोनात वडिलांचं निधन, कुटुंबाची जबाबदारी पेलली; लालबाग अपघातात तरुणीचा मृत्यू
लालबाग परिसरात रविवारी भीषण असा अपघात झाला. एका मद्यधुंद अवस्थेतील प्रवाशाने बसचे स्टेअरिंग पकडल्याने गाडीने ९ जणांना धडक दिली. या अपघातात एका २८ वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला.
advertisement
2/5
नुपुरा मणियार असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. नुपुराच्या मृत्यूमुळे मणियार कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. कोरोना काळात वडिलांचं निधन झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी तिच्यावरच होती.
advertisement
3/5
नुपुराच्या वडिलांचं कोरोना काळात निधन झालं. वडिलांच्या जागी अनुकंपा तत्वावर नुपुरा आयकर खात्यात लिपिक म्हणून रुजू झाली होती. चिंचपोकळी इथल्या मुक्ताई बिल्डिंगमध्ये नुपुरा तिच्या आई आणि लहान बहिणीसोबत राहत होती.
advertisement
4/5
नुपुराच्या अशा अपघाती मृत्यूने कुटुंबाला धक्का बसला आहे. दिवाळीत ती नव्या आयुष्याला सुरुवात करणार होती. पण जोडीदार सोबत असतानाच हा अपघात झाला आणि तिचा त्यात मृत्यू झाला. तर तिचा जोडीदार अपघातात जखमी झाला आहे.
advertisement
5/5
लालबागमध्ये रूट ६६ वर एक इलेक्ट्रिक बस सायनच्या राणी लक्ष्मीबाई चौकाच्या दिशेने जात होती तेव्हा ही घटना घडली. दारुच्या नशेत असलेल्या एका प्रवाशाने बस चालकाशी वाद घातला. त्यानंतर बसने रस्त्यावरून जाणाऱ्या ९ जणांना धडक दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Lalbaug Accident : कोरोनात बाबांचं निधन, कुटुंबाची जबाबदारी पेलली; लालबाग अपघातात मृत्यूने संसाराचं स्वप्नही राहिलं अपुरं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल