TRENDING:

Weather Alert: दिवाळीआधीच वारं फिरलं, कोकणात पुन्हा पावसाचा जोर, मुंबई-ठाण्यात वेगळीच स्थिती

Last Updated:
Weather Alert: कोकणातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर कोकणात पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने इशारा दिला आहे.
advertisement
1/5
दिवाळीआधीच वारं फिरलं, कोकणात पुन्हा पावसाचा जोर, मुंबई-ठाण्यात वेगळीच स्थिती
दिवाळीच्या तोंडावर पुन्हा एकदा कोकण किनारपट्टीवर पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस शांत झाला होता, मात्र आता दोन दिवसांपासून रिमझिम सरी पुन्हा बरसत आहेत. आज, 17 ऑक्टोबर 2025 रोजी, हवामानात थोडाफार बदल दिसून येणार आहे. काही भागांत रिमझिम सरींचा अनुभव येईल, तर काही ठिकाणी हवामान कोरडे राहील.
advertisement
2/5
मुंबईत आज पावसाने विश्रांती घेतली आहे. सकाळपासून हवामान कोरडे असून आकाश किंचित ढगाळ आहे. दिवस चढताच उकाडा जाणवेल आणि आर्द्रतेमुळे दमट वातावरण टिकून राहील. तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज असून रात्री हलका गारवा जाणवेल.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबई भागात आज मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता नसून, प्रत्यक्षात या भागात दुपारनंतर हलक्या सरी कोसळणार आहेत. सकाळी आकाश ढगाळ राहील, आणि दुपारनंतर अधूनमधून पावसाच्या सरी बरसतील. तापमान 30 ते 33 अंश सेल्सिअस राहील, तर दमट हवेमुळे उकाडा जाणवेल.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. काल दिवसभर रिमझिम सरी झाल्या होत्या आणि आजही वातावरण तसंच राहणार आहे. किनारपट्टीवरील भागांत वाऱ्याचा वेग किंचित वाढलेला दिसून येईल. नागरिकांनी बाहेर पडताना छत्री जवळ ठेवावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
5/5
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागांत अधूनमधून रिमझिम सरी कोसळत आहेत. आजही हवामान ढगाळ राहील आणि दुपारनंतर सरींचा जोर किंचित वाढू शकतो. किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग तासाला 25 ते 30 किमीपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. शनिवारपासून 2-3 दिवस पावसाचा जोर जास्त राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: दिवाळीआधीच वारं फिरलं, कोकणात पुन्हा पावसाचा जोर, मुंबई-ठाण्यात वेगळीच स्थिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल