TRENDING:

Weather Alert: महाराष्ट्रात अचानक वारं फिरलं, बर्फासारखी थंडी पडणार, 9 जानेवारीपासून अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. 9 डिसेंबरला हवामान विभागाने अलर्ट दिला आहे.
advertisement
1/5
महाराष्ट्रात अचानक वारं फिरलं, बर्फासारखी थंडी पडणार, 9 जानेवारीपासून अलर्ट
आजचं हवामान</a> अपडेट जाणून घेऊ. " width="1500" height="1000" /> नव्या वर्षात हवामानात सातत्याने बदल होत असून राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबई-पुण्यात कधी थंड वाऱ्यांमुळे गारवा, तर कधी पहाटे धुक्याची चादर दिसत असून काही ठिकाणी हवा बिघडल्याचे चित्र आहे. 9 जानेवारी रोजी राज्यात पावसाचा कोणताही धोका नसला, तरी सकाळी आणि रात्री थंडीचा कडाका कायम राहणार आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि आसपासच्या भागांत हवामान कोरडे असले गारठा वाढला आहे. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळेत काही भागांत धुके दिसून येऊ शकते. मुंबई आणि उपनगरांत कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, तर किमान तापमान 19 ते 21 अंशांच्या आसपास असण्याचा अंदाज आहे. समुद्राच्या प्रभावामुळे थंडीचा कडाका जाणवणार नाही, मात्र पहाटे गार हवा आणि हलका गारठा अनुभवायला मिळेल. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही अशीच हवामानस्थिती राहणार आहे.
advertisement
3/5
पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागात सकाळी धुक्याची शक्यता असून, दिवसभर आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील. पुण्यात कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 12 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर परिसरातही पहाटे गारवा जाणवेल. दिवसा सूर्यप्रकाशामुळे तापमान वाढेल, त्यामुळे थंडी आणि उबदार हवामान अनुभवायला मिळणार आहे.
advertisement
4/5
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव तुलनेने अधिक राहणार आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर भागात किमान तापमान 10 ते 13 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत कोरडे हवामान राहील, मात्र सकाळी धुके आणि रात्री गारठा जाणवेल. विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा आणि चंद्रपूर भागात थंडीचा कडाका कायम असून किमान तापमान 10 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
5/5
एकंदरीत, पुढील काही दिवस राज्यातील हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. सकाळच्या वेळी धुके आणि रात्री गारवा जाणवत राहील, तर दिवसा सूर्यप्रकाशामुळे तापमानात किंचित वाढ दिसून येईल. मुंबई–पुण्यासह राज्यातील बहुतांश भागांत थंडीचा प्रभाव कायम राहणार असून, किमान तापमानात मोठी घसरण होण्याची चिन्हे नाहीत. हवामान स्थिर राहण्याचा अंदाज असून, हिवाळ्याची सौम्य थंडी नागरिकांना अनुभवायला मिळेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: महाराष्ट्रात अचानक वारं फिरलं, बर्फासारखी थंडी पडणार, 9 जानेवारीपासून अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल