Weather Alert: महाराष्ट्रात थंडीची लाट ओसणार की नाही? IMD चा पुन्हा अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात सातत्याने मोठे बदल जाणवत आहेत. 19 डिसेंबरला थंडीची लाट कमी झाली असली तरी हुडहुडी कायम आहे.
advertisement
1/5

उत्तरेतील शीत लहरींचा प्रभाव कमी झाल्याने डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला असणारी थंडीची लाट ओसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभर हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहेत. सध्या बहुतांश भागांत गुलाबी थंडीच अनुभवायला मिळत आहे. तरीही काही भागात थंडीचा कडाका जाणवणार आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील 19 डिसेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवर आज हवामान स्थिर आणि कोरडे राहणार आहे. सकाळच्या वेळेत तापमान साधारण 20 ते 22 अंशांच्या आसपास राहील, तर दिवसा ते 31 ते 32 अंशांपर्यंत पोहोचेल. कालप्रमाणेच आजही सकाळी थोडा गारवा जाणवेल, मात्र दुपारनंतर उबदार हवामान जाणवणार आहे. समुद्राकडून येणाऱ्या दमट हवेमुळे या भागांत थंडीचा प्रभाव मर्यादितच राहतो आहे. पुढील काही दिवसांतही मुंबई परिसरात थंडी फारशी वाढण्याचे संकेत नाहीत.
advertisement
3/5
पुणे शहर आणि पुण्यातील ग्रामीण भागात थंडीचा अनुभव मुंबईपेक्षा थोडा अधिक आहे. आज सकाळी तापमान 13 ते 15 अंशांच्या दरम्यान राहणार असून ग्रामीण भागात काही ठिकाणी गारवा अधिक जाणवू शकतो. दिवसा तापमान 29 ते 30 अंशांच्या आसपास राहणार आहे. कालच्या तुलनेत तापमानात फारसा बदल नाही. पुढील दोन-तीन दिवसांत पुणे आणि आसपासच्या भागात सकाळची थंडी कायम राहील, मात्र कडाक्याच्या थंडीची शक्यता सध्या तरी कमी आहे.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि संपूर्ण मराठवाडा विभागात आज सकाळी थंडी जाणवेल. किमान तापमान 12 ते 14 अंशांच्या आसपास राहणार असून कालच्या तुलनेत काही ठिकाणी किंचित घट दिसून येते. दिवसा मात्र तापमान वाढून 30 अंशांच्या आसपास राहणार आहे. त्यामुळे मराठवाड्यात सकाळी थंडी आणि दिवसा उबदार हवामान असा विरोधाभास जाणवणार आहे. पुढील काही दिवसांतही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
विदर्भातही आज हवामान कोरडे राहणार आहे. सकाळी काही भागांत तापमान 11 ते 13 अंशांपर्यंत खाली येऊ शकते, त्यामुळे थंडीचा अनुभव तुलनेने अधिक राहील. मात्र दिवसा तापमान वाढून 30 अंशांच्या आसपास पोहोचेल. गुरुवारच्या तुलनेत फारसा मोठा बदल नाही. पुढील दोन-तीन दिवसांत विदर्भात सकाळची थंडी टिकून राहणार असून दिवसा उष्णता जाणवेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: महाराष्ट्रात थंडीची लाट ओसणार की नाही? IMD चा पुन्हा अलर्ट