TRENDING:

Weather Alert: वारं फिरलं! 20 जानेवारीला हवामानात मोठे बदल, मुंबई ते नागपूर IMD चा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: पुढील तीन दिवस राज्यात थंडी सौम्य स्वरूपात राहण्याची शक्यता असून, त्यानंतर किमान तापमानात घट होऊन पुन्हा थंडी वाढू शकते.
advertisement
1/5
वारं फिरलं! 20 जानेवारीला हवामानात मोठे बदल, मुंबई ते नागपूर IMD चा अलर्ट
राज्यात सध्या थंडीचा जोर तुलनेने कमी झालेला असला तरी तापमानातील चढ-उतार कायम आहेत. सकाळी आणि रात्री काही भागांत गारवा जाणवत असताना, दुपारच्या वेळेत मात्र उष्णतेचा त्रास वाढताना दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस राज्यात थंडी सौम्य स्वरूपात राहण्याची शक्यता असून, त्यानंतर किमान तापमानात घट होऊन पुन्हा थंडी वाढू शकते. या पार्श्वभूमीवर 20 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार आहे? जाणून घेऊ.
advertisement
2/5
कोकण विभागासह राज्यातील बहुतांश भागांत आज हवामान मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत आकाश स्वच्छ राहणार असून पावसाची शक्यता नाही. सकाळी आणि रात्री सौम्य गारवा जाणवेल, मात्र दुपारच्या वेळेत उष्णतेचा प्रभाव वाढू शकतो. मुंबईत कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरातही अशीच स्थिती राहणार असून दमट वातावरणामुळे उकाडा जाणवू शकतो.
advertisement
3/5
पश्चिम महाराष्ट्रात पहाटे थंडीचा अनुभव येणार असून, त्यानंतर तापमान हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. पुणे शहर आणि परिसरात सकाळच्या वेळेत हलक्या धुक्याची शक्यता असून आकाश अंशतः निरभ्र राहील. येथे कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत सकाळी गारवा जाणवेल, तर दुपारी उष्णता वाढल्याने मिश्र हवामानाचा अनुभव येईल. ग्रामीण भागात रात्रीचा गारवा तुलनेने अधिक जाणवू शकतो
advertisement
4/5
मराठवाडा विभागात सकाळच्या वेळेत थंड वातावरण राहणार असून दुपारनंतर सूर्यप्रकाशामुळे उष्णता वाढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथे हवामान मुख्यतः निरभ्र राहणार असून कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस राहील. विदर्भात थंडीचा प्रभाव काही जिल्ह्यांत अजूनही जाणवत असून तापमानातील चढ-उतार सुरूच आहेत. नागपूरमध्ये कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. विदर्भात थंडीचा प्रभाव काही जिल्ह्यांत अजूनही जाणवत असून तापमानातील चढ-उतार सुरूच आहेत. नागपूरमध्ये कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि रात्री गारवा जाणवेल, तर दुपारी उष्णतेचा त्रास वाढू शकतो.
advertisement
5/5
एकूणच, 20 जानेवारी रोजी महाराष्ट्रात हवामान कोरडे ते निरभ्र राहणार असून थंडी सौम्य स्वरूपात कायम राहील. सकाळी व रात्री गारवा आणि दुपारी उकाडा असा हवामानाचा दुहेरी अनुभव नागरिकांना येण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस तापमानात मोठा बदल अपेक्षित नसला, तरी त्यानंतर पुन्हा थंडी वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी बदलत्या हवामानानुसार आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: वारं फिरलं! 20 जानेवारीला हवामानात मोठे बदल, मुंबई ते नागपूर IMD चा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल