Madhuri Dixit : हाच तो माधुरी दीक्षितचा फोटो; जो पाहताच तिला फिल्ममध्ये मिळाली होती एंट्री
- Published by:Priya Lad
Last Updated:
Madhuri Dixit First Film Abodh Photo : 90 च्या दशकातील अभिनेत्री माधुरी दीक्षित, धकधक गर्ल आजही कित्येकांच्या मनावर राज्य करते आहे. माधुरीचा फक्त फोटो पाहून तिला फिल्ममध्ये घेतलं गेल्याचं तुम्हाला माहिती असेल. माधुरीने पहिल्या फिल्मच्या ऑडिशनसाठी पाठवलेला तो फोटो तुम्ही पाहिला आहे का?
advertisement
1/5

माधुरी दीक्षितची पहिली फिल्म अबोध जी 1984 मध्ये रिलीज झाली होती. त्यावेळी माधुरी बारावीत होती, ती फक्त 17 वर्षांची होती. एका टीव्ही शोमध्ये माधुरी दीक्षितने सांगितलं होतं की, त्यावेळी ती शिकत होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत मोकळा वेळ मिळत होता, म्हणून तिने फिल्म करायचं ठरवलं. नाहीतर फिल्ममध्ये करिअर करायचा तिचा विचार नव्हता. त्याबाबत ती सीरिअस नव्हती.
advertisement
2/5
राजश्री प्रोडक्शनची ही फिल्म दिग्दर्शक हिरेन नाग यांनी दिग्दर्शित केली. या फिल्मसाठी राजश्री प्रॉडक्शन अशा अभिनेत्रीच्या शोधात होती, जी एक निरागस पात्र खऱ्या अर्थाने साकारू शकेल. राजश्री प्रोडक्शनशी संंबंधित एका व्यक्तीची मुलगी माधुरीच्या मोठ्या बहिणीची मैत्रीण होती. त्यामुळे माधुरीला घरबसल्या फिल्मची ऑफर मिळाली होती. गोविंद मुनिस यांनी माधुरीची निवड केली होती. निर्मात्यांनी माधुरी दीक्षितला पाहिलं आणि तिला ब्रेक दिला.
advertisement
3/5
अबोधमध्ये माधुरी साकारत असलेल्या पात्राच्या अनेक वेगवेगळ्या छटा होत्या. या फिल्ममध्ये अशा विवाहित महिलेची कहाणी आहे जिला नातेसंबंध आणि वैवाहिक जीवनातील गुंतागुंतीची जाणीव नसते. आधी अल्लडपणा नंतर परिपक्वता, एका खोडकर मुलीपासन ते दु:खी नायिकेपर्यंत. माधुरीने तरुण वयातच तिच्या पहिल्या चित्रपटात प्रत्येक छटा दाखवली. या फिल्ममध्ये माधुरीसोबत बंगाली फिल्म अभिनेता तपस पॉल होता. माधुरीच्या अभिनयाने त्यालाही मागे टाकलं. त्यानंतर त्याला हिंदी फिल्ममध्ये फारसं काम मिळालं नाही.
advertisement
4/5
ही फिल्म काही फार चालली नाही पण माधुरीची जादू मात्र चालली. सुभाष घईंसह अनेक चित्रपट निर्मात्यांनी माधुरीच्या अभिनयाची दखल घेतली. माधुरीला यानंतर एकामागोमाग अनेक फिल्म्सच्या ऑफर्स येऊ लागल्या. पुढे माधुरीने शिक्षण घेत असतानाही चित्रपटांमध्ये काम करणं सुरू ठेवलं. कॉटन साडीत निरागस, लाजाळू मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पुढे धकधक गर्ल बनेल याचा कुणी विचारही केला नव्हता.
advertisement
5/5
फिल्मी बिटवरील माहितीनुसार अबोध साइन करण्याआधी माधुरीने राजश्री प्रोडक्शनला ऑडिशनसाठी पाठवलेला हा फोटो आहेत अजूनही हा फोटो राजश्री प्रोडक्शनच्या मुंबईतील ऑफिसच्या भिंतीवर असल्याचं सांगितलं जातं. सोशल मीडियावरही माधुरीचा तो फोटो आहे. (सर्व फोटो : सोशल मीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Madhuri Dixit : हाच तो माधुरी दीक्षितचा फोटो; जो पाहताच तिला फिल्ममध्ये मिळाली होती एंट्री