TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास महत्त्वाचे, थंडीची पुन्हा येणार लाट, हवामान खात्याचा अलर्ट

Last Updated:
विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात राज्यातील नीचांकी 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, थंडीचा प्रभाव पूर्णपणे ओसरलेला नसल्याचं स्पष्ट होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसही असाच संमिश्र हवामानाचा अनुभव राज्यभर राहण्याची शक्यता आहे.
advertisement
1/5
पुढील 24 तास महत्त्वाचे, थंडीची पुन्हा येणार लाट, हवामान खात्याचा अलर्ट
वर्षाची सुरुवात होताच जाणवत असतानामहाराष्ट्राच्या हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहेत. काही भागांत पहाटे आणि रात्री थंडीचा गारवा, दुपारच्या वेळी मात्र उकाडा त्रासदायक ठरत आहे. तापमानातील या चढ-उतारामुळे नागरिकांना थंडी आणि उष्णता अशा दोन्ही टोकांचा अनुभव येत आहे. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात राज्यातील नीचांकी 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, थंडीचा प्रभाव पूर्णपणे ओसरलेला नसल्याचं स्पष्ट होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसही असाच संमिश्र हवामानाचा अनुभव राज्यभर राहण्याची शक्यता आहे. पाहुयात, 18 जानेवारी रोजी राज्यातील विविध भागांत हवामान कसं असणार आहे.
advertisement
2/5
कोकण किनारपट्टीसह मुंबई महानगर परिसरात 18 जानेवारी रोजी हवामान मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सकाळी व रात्री हलका गारवा जाणवेल, मात्र दुपारच्या वेळेत उकाडा वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज असून किमान तापमान 18 अंशांच्या आसपास राहील. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतही अशीच परिस्थिती राहणार असून थंडीचा जोर काहीसा कमी झाला असला तरी सकाळ-संध्याकाळी गारवा टिकून आहे. कोकणात पावसाची शक्यता नसून हवामान कोरडं राहील.
advertisement
3/5
पश्चिम महाराष्ट्रात पहाटे थंडीचा प्रभाव अधिक जाणवेल, त्यानंतर दिवसभर तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागात सकाळच्या वेळेत हलकं धुकं पडू शकतं. येथे कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत ग्रामीण भागात थंडीचा प्रभाव शहरांच्या तुलनेत अधिक जाणवू शकतो. सकाळी गारवा आणि दुपारी उकाडा असा हवामानाचा अनुभव नागरिकांना येणार आहे. बहुतांश भागांत हवामान कोरडं राहील.
advertisement
4/5
मराठवाडा आणि विदर्भ विभागात थंडीचा प्रभाव तुलनेने अधिक आहे. मराठवाड्यात सकाळी थंड वातावरण राहील, मात्र सूर्यप्रकाश वाढल्यानंतर दुपारी उष्णता जाणवेल. छत्रपती संभाजीनगर येथे कमाल तापमान 32 अंश, तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. विदर्भात काही जिल्ह्यांत थंडीचा जोर कायम असून गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान 8 अंशांपर्यंत घसरलं आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान सुमारे 31 अंश आणि किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सकाळी आणि रात्री गारवा जाणवेल, तर दुपारी उकाडा जाणवू शकतो.
advertisement
5/5
एकंदरीत, राज्यात पुढील काही दिवस तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता नगण्य असून हवामान मुख्यतः कोरडं राहील. नवीन आठवड्याच्या सुरुवातीलाही सकाळी थंडी आणि दुपारी उष्णता असा संमिश्र हवामानाचा अनुभव नागरिकांना येऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास महत्त्वाचे, थंडीची पुन्हा येणार लाट, हवामान खात्याचा अलर्ट
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल