TRENDING:

Manohar Joshi Passed Away : जोशी सरांना निरोप देण्यास पोहोचले ठाकरे, शिंदे गटाचे नेतेही उपस्थित, पहिल्यांदाच आले एकत्र, PHOTOS

Last Updated:
Manohar Joshi Passed Away : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
advertisement
1/7
जोशी सरांना निरोप देण्यास पोहोचले ठाकरे, शिंदे गटाचे नेतेही उपस्थित, PHOTOS
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे आज पहाटे (23 फेब्रुवारी) तीनच्या सुमारास वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.
advertisement
2/7
मनोहर जोशी यांच्या निधनानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
3/7
मनोहर जोशी यांच्या अंत्ययात्रेत ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते एकत्र सहभागी झालेले पाहायला मिळाले.
advertisement
4/7
शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशींना श्रद्धांजली व्यक्त करत असताना त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
advertisement
5/7
राज्यपाल रमेश बैस, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनीही मनोहर जोशी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत कुटुंबीयांचे सांत्वन केलं.
advertisement
6/7
मनोहर जोशी यांच्या अंत्यविधीला सर्वपक्षिय राजकिय नेते उपस्थित. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री दिपक केसरकर, शंभूराजे देसाई, खासदार राहूल शेवाळे उपस्थित होते.
advertisement
7/7
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना शासकिय सलामी देऊन अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी प्रचंड मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Manohar Joshi Passed Away : जोशी सरांना निरोप देण्यास पोहोचले ठाकरे, शिंदे गटाचे नेतेही उपस्थित, पहिल्यांदाच आले एकत्र, PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल