Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंचा असाही साधेपणा! VIP सेवा नाकारत पायी गाठला तिरुमला डोंगर
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Shrikant Shinde : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा साधेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. तिरुपती बालाजीला त्यांनी चक्क पायी जात दर्शन घेतलं आहे. (अजित मांढरे, प्रतिनिधी)
advertisement
1/6

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हे जमीनवर पाय असलेलं नेतृत्व असल्याची अनेकांना माहिती आहे. याचीच प्रचिती नुतकत्याच घडलेल्या प्रसंगातून समोर आली आहे.
advertisement
2/6
कुठल्याही देवस्थानी दर्शन घेण्यासाठी लोकप्रतिनिधी मग ते आमदार, खासदार असो की मंत्री नेहमी व्हीआयपी सेवेचा लाभ घेतात. मात्र, या गोष्टीला अपवाद ठरवेत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे.
advertisement
3/6
खासदार श्रीकांत शिंदे यांची तिरूपती येथील बालाजीवर नितांत श्रद्धा आहे. ते आवर्जून बालाजीच्या दर्शनाला जात असतात. मात्र, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे पुत्र आणि स्वतः खासदार असूनही श्रीकांत शिंदे यांनी व्हीआयपी सेवा नाकारत पायी जात दर्शन घेण्याचे ठरवले.
advertisement
4/6
तिरुपती बालाजीच्या डोंगराच्या पायथ्यापासून ते थेट मंदिरापर्यंतचा पायी प्रवास त्यांनी केला. हा प्रवास काही साधासुधा नाही. या प्रवासात साडेतीन हजार पेक्षा जास्त पायऱ्या चालत जावे लागते. आणि या साधासुध्या पायऱ्या नसून शेकडो मीटर उंच डोंगरावर जाणाऱ्या पायऱ्या आहेत.
advertisement
5/6
या प्रवासात डॉ. श्रीकांत शिंदे साहेबांना अनेक भाविक भेटले. आपल्या कामांमुळे प्रसिद्ध झालेले डॉ. श्रीकांत शिंदे यांना राज्यातील अनेक भागातही एक इन्फ्रा मॅन म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातून आलेल्या अनेक सामान्य कुटुंबातील भाविकांनी या सुमारे तीन तासांच्या प्रवासात डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधला.
advertisement
6/6
यावेळी अनेक तरुण मंडळी सुद्धा भेटत होती. तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन त्यांनी केले. अखेर साडेतीन हजार पायऱ्या पार करत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तिरुपती बालाजी दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी देवाला प्रथेप्रमाणे केसही अर्पण केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंचा असाही साधेपणा! VIP सेवा नाकारत पायी गाठला तिरुमला डोंगर