Vande Bharat Express: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, मुंबई-नांदेड वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त ठरला, पाहा वेळापत्रक आणि तिकिट दर
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
Vande Bharat Express: मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. जालना ते मुंबई धावणारी वंदेभारत एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत धावणार आहे.
advertisement
1/7

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. जालना ते मुंबई धावणारी वंदेभारत एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. ही गाडी कधीपासून सुरू होणार? वेळापत्रक आणि तिकीट तर काय असणार पाहुयात.
advertisement
2/7
वंदे भारत एक्स्प्रेस ही सेमी-हायस्पीड ट्रेन असून, ती 160 किमी/तास वेगाने धावते. मुंबई-नांदेड वंदेभारत एक्सप्रेस 26 ऑगस्टपासून धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी दुपारी 1.10 ला निघणार आहे आणि नांदेडला रात्री 10.50 ला पोहचेल.
advertisement
3/7
वंदे भारत एक्स्प्रेस ही मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटेल. दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, अंकाई, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड या स्थानकांवर ही गाडी थांबेल.
advertisement
4/7
मुंबई ते जालन्यापर्यंत वंदे भारत एक्स्प्रेस ही अगोदर चालत होती. मात्र, आता तिच विस्तार करण्यात आला असून ती नांदेडपर्यंत धावणार आहे. त्यामुळे परभणी आणि नांदेडमधील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार होईल.
advertisement
5/7
सीएसएमटी ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दर एसी चेअर कार 1,750 रुपये आणि एक्झिक्यूटिव्ह एसी चेअर कार 3,300 रुपये असेल. वंदे भारत एक्सप्रेस परतीच्या प्रवासामध्ये ही गाडी नांदेडहून सकाळी 5 वाजता निघेल.
advertisement
6/7
यात एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास कोच उपलब्ध आहेत, जे प्रवाशांना अत्याधुनिक सुविधांसह आरामदायक प्रवास देतात.
advertisement
7/7
सीसीटीव्ही, ऑटोमॅटिक दरवाजे आणि वैक्यूम टॉयलेट्स यांसारख्या सुविधांमुळे ही ट्रेन प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे. तिकीट बुकिंगसाठी आयआरसीटीसी अॅप किंवा वेबसाइटचा वापर करता येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Vande Bharat Express: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, मुंबई-नांदेड वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त ठरला, पाहा वेळापत्रक आणि तिकिट दर