TRENDING:

Mumbai Weather : मुंबईसह कोकणातील हवामानात मोठे बदल, आता नवं संकट, हवामान विभागाकडून अलर्ट

Last Updated:
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोकण किनारपट्टीवरील पावसाचा जोर ओसरल्याचं चित्र आहे. कोणत्याही जिल्ह्याला हवामान विभागाकडून अलर्ट जारी केलेला नाही.
advertisement
1/5
मुंबईसह कोकणातील हवामानात मोठे बदल, आता नवं संकट, हवामान विभागाकडून अलर्ट
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोकण किनारपट्टीवरील पावसाचा जोर ओसरल्याचं चित्र आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. मात्र, आज 6 ऑक्टोबर रोजी हवामान सामान्य असून, कोणत्याही जिल्ह्याला हवामान विभागाकडून अलर्ट जारी केलेला नाही. त्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळालाय.
advertisement
2/5
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या तिन्ही शहरांमध्ये आज वातावरण स्थिर असून सकाळपासूनच ढगाळ पण कोरडे हवामान आहे. पावसाची शक्यता अत्यल्प आहे. तापमान 31 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता असून किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याचा वेग 12 ते 15 किमी प्रतितास इतका राहील. दमट वातावरणामुळे उकाडा जाणवेल.
advertisement
3/5
पालघर जिल्ह्यात आज वातावरण काही भागात कडक ऊन तर काही ठिकाणी रिमझिम सरी बरसतील अशा प्रकारच असून काही भागात मात्र पावसाला विश्रांती आहे. सकाळी थोडं ढगाळ वातावरण असून हवा तुलनेने स्थिर आहे. तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस, वाऱ्याचा वेग 10-12 किमी प्रतितास आणि दमट हवेमुळे उकाडा जाणवेल.
advertisement
4/5
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टीवरील या जिल्ह्यांमध्ये आज हवामान शांत आहे. गेल्या काही दिवसांपासून रिमझिम सरी पडल्यानंतर आज पाऊस थांबलेला दिसतोय. तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, तर वाऱ्याचा वेग 12-14 किमी प्रतितास असेल. समुद्रात सौम्य ते मध्यम लाटा राहतील. किनारी भागात दमट उष्णता जाणवेल.
advertisement
5/5
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 7ऑक्टोबरपासून पुन्हा हलक्या सरींचा अंदाज आहे. त्यामुळे सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी, काही भागांत पुन्हा रिमझिम सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Weather : मुंबईसह कोकणातील हवामानात मोठे बदल, आता नवं संकट, हवामान विभागाकडून अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल