TRENDING:

Mumbai weather : मुंबईतील हवामानात पुन्हा बदल, कोकणाला पाऊस झोडपणार, हवामान खात्याचा अलर्ट

Last Updated:
20 ऑक्टोबर रोजीही या भागांतील हवामानात फारसा फरक दिसणार नाही. काही ठिकाणी उन्हाचा तडाखा, तर काही ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता कायम आहे.
advertisement
1/5
मुंबईतील हवामानात पुन्हा बदल, कोकणाला पाऊस झोडपणार, हवामान खात्याचा अलर्ट
दिवसेंदिवस बदलत जाणाऱ्या हवामानामुळे कोकणासह मुंबई परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा वेगवेगळ्या वातावरणाचा अनुभव येतोय. 20 ऑक्टोबर रोजीही या भागांतील हवामानात फारसा फरक दिसणार नाही. काही ठिकाणी उन्हाचा तडाखा, तर काही ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता कायम आहे.
advertisement
2/5
मुंबईमध्ये आज वातावरण कोरडे असून पावसाची शक्यता नाही. गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना तीव्र उन्हाला सामोरे जावे लागत आहे. सकाळपासूनच तापमान वाढले असून दुपारनंतर उकाडा वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबईतही हवामान कोरडे असून उन्हाचा पारा वाढला आहे. गेले अनेक दिवस या भागांमध्ये अधूनमधून ढगाळ वातावरण असले तरी आता पुन्हा प्रखर ऊन पडत आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात देखील मुंबईसारखीच परिस्थिती असून येथेही गेल्या काही दिवसांत पडणारा हलका पाऊस आता थांबला आहे. तापमान वाढले असून उन्हाळ्याची झळ जाणवू लागली आहे.
advertisement
5/5
कोकणातील रायगड जिल्ह्यात हवामान कोरडे आणि स्थिर आहे. रत्नागिरीमध्ये मात्र काही ठिकाणी रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला असून हा सलग तिसरा दिवस आहे. त्यामुळे या भागात अधूनमधून पाऊस आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai weather : मुंबईतील हवामानात पुन्हा बदल, कोकणाला पाऊस झोडपणार, हवामान खात्याचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल