TRENDING:

Mumbai Weather Marathi: ठाण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, मुंबईत काय स्थिती? पाहा आजचं हवामान अपडेट

Last Updated:
ठाण्यात सकाळी काही भागांत पावसाची शक्यता आहे, तर दुपारी वातावरणात बदल होऊन सूर्यप्रकाश आणि ढग यांचा समावेश असलेली स्थिती असेल.
advertisement
1/5
ठाण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, मुंबईत काय स्थिती? पाहा आजचं हवामान
जून महिना म्हटलं की पावसाळा सुरू झालाच पण यंदा मात्र जून महिन्यात पावसाने दडी मारली आहे. कधी ऊन तर कधी हलक्या सरींचा पाऊस पडतोय. कोकण किनारपट्टी भागातील शहराना तर जून महिन्यातही कडक उन्हाळ्याला समोर जाव लागतय. आज 10 जून 2025 रोजी मुंबई, पालघर, ठाणे, नवी मुंबई व संपूर्ण कोकण परिसरात हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण राहील, काही भागांत हलक्याशा स्वरूपाचा पाऊस किंवा रिमझिमची शक्यता आहे. चला तर आजचे हवामान अपडेट सविस्तर पाहूया.
advertisement
2/5
10 जून रोजी मुंबईत हवामान प्रामुख्याने ढगाळ राहील. सकाळी हवेत सौम्य उष्णता व ओलावा जाणवेल. कमाल तापमान 32 अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता असून, रात्रीचे तापमान सुमारे 28 अंश दरम्यान राहील. दुपारी आणि संध्याकाळी काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा रिमझिम होण्याची शक्यता आहे. आकाश सतत ढगांनी व्यापलेले राहील . तसंच आज दाट वाफाळ वातावरण तयार होईल आणि शहरातील वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर याचा थोडाफार परिणाम होऊ शकतो. शहरातील समुद्रकिनाऱ्यांजवळील भागात आर्द्रता अधिक असल्यामुळे थोडा अस्वस्थपणा जाणवू शकतो.
advertisement
3/5
10 जून 2025 रोजी पालघर जिल्हा व नवी मुंबई या दोन्ही भागांमध्ये हवामानाचा स्वभाव वेगळा असला तरी त्यात एक साम्य म्हणजे उष्णतेच्या झळा आणि वातावरणातील बदलते स्वरूप. पालघर जिल्ह्यात सकाळी थोड्याशा वेळेसाठी हलक्या सरींची शक्यता असून वातावरण अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान 35 अंश सेल्सियसपर्यंत जाऊ शकते, त्यामुळे दुपारी उष्णतेची तीव्रता अधिक जाणवेल. ओलावा अधिक असल्यामुळे दमट वाऱ्यामुळे घामाचे प्रमाण वाढेल.
advertisement
4/5
ठाणे जिल्ह्याचे हवामान 10 जून रोजी अत्यंत बदलत्या स्वरूपाचे राहील. सकाळी काही भागांत पावसाची शक्यता आहे, तर दुपारी वातावरणात बदल होऊन सूर्यप्रकाश व ढग यांचा समावेश असलेली स्थिती असेल. कमाल तापमान 35 अंश सेल्सियसपर्यंत पोचण्याची शक्यता असून, रात्री तापमान 27–28 अंशांदरम्यान राहील. वाफाळ आणि दमट हवामानामुळे अस्वस्थतेची भावना निर्माण होऊ शकते. ठाण्यातील डोंगरी भागात किंवा झाडीबहुल परिसरात विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
कोकण विभाग (ज्यात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसारखे जिल्हे समाविष्ट होतात) याठिकाणी 10 जूनला हवामान तुलनात्मकदृष्ट्या सौम्य राहणार आहे. सकाळी व दुपारी अंशतः ढगाळ आकाश असून मधूनमधून सूर्यप्रकाश अनुभवता येईल. काही भागांमध्ये सकाळी थोडी रिमझिम किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सियसच्या आसपास राहील, तर रात्री 26 अंशांपर्यंत खाली येईल. कोकण भागात आर्द्रतेमुळे वातावरण दमट राहील पण तितकेसे तापदायक वाटणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Weather Marathi: ठाण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, मुंबईत काय स्थिती? पाहा आजचं हवामान अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल