Mumbai Rain: मुंबईत पुन्हा हवापालट, कोकणात पावसाची शक्यता, पाहा आजचं हवामान अपडेट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकणातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
1/5

राज्यातील हवामानात मोठा बदल जाणवत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकणातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
2/5
मुंबईत आज सकाळपासून आकाश ढगाळ असून, काही भागांत हलक्या सरी नोंदल्या गेल्या आहेत. दुपारनंतर पावसाचा जोर थोडा वाढू शकतो. हवामान विभागानुसार, आजचे कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दमट हवामानामुळे नागरिकांना उकाडा जाणवण्याची शक्यता आहे, परंतु पावसामुळे थोडा दिलासा मिळेल.
advertisement
3/5

4/5
पालघर जिल्ह्यात मान्सूनने सौम्य सुरुवात केली असून, आज काही भागांत डहाणू, तलासरी, जव्हार परिसरात हलक्या स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी अजून प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला आहे, कारण पाऊस अजून पूर्णतः स्थिरावलेला नाही.
advertisement
5/5
कोकण विभागात विशेषतः रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हवामानात बदल जाणवतो आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून आकाश पूर्णपणे ढगाळ होते. चिपळूण, गुहागर, आणि मंडणगड परिसरात हलक्या सरी अनुभवायला मिळाल्या आहेत. आज दिवसभर वातावरण दमट राहण्याची शक्यता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Rain: मुंबईत पुन्हा हवापालट, कोकणात पावसाची शक्यता, पाहा आजचं हवामान अपडेट