Weather update : महाराष्ट्रातील 'या' भागांत आजही पावसाचा इशारा; जाणून घ्या कसं असेल वातावरण?
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
चक्रीवादळ मिचॉन्ग अखेर तामिळनाडूला सोडून आंध्र किनारपट्टीवर धडकलं. या दरम्यान त्याचा वेग ताशी 90 ते 110 किमी इतका होता.
advertisement
1/5

मुंबई, 6 डिसेंबर : चक्रीवादळ मिचॉन्ग अखेर तामिळनाडूला सोडून आंध्र किनारपट्टीवर धडकलं. या दरम्यान त्याचा वेग ताशी 90 ते 110 किमी इतका होता. IMD च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिचॉन्ग चक्रीवादळ मंगळवारी दुपारी 1.40 च्या सुमारास आंध्र प्रदेशातील बापटला भागात धडकलं.
advertisement
2/5
या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोनासिमा, काकीनाडा, कृष्णा, बापटला आणि प्रकाशम यासह आंध्र प्रदेशातील सात जिल्ह्यांतील 9,454 नागरिकांना 211 मदत शिबिरांमध्ये आधीच सुरक्षितपणे हलवण्यात आलं. या चक्रीवादळाचा मोठा फटका हा तामिळनाडू राज्याला बसला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
advertisement
3/5
दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मिचॉन्ग चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून मंगळवारी देण्यात आला आहे.
advertisement
4/5
चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यातील आद्रर्ततेचे प्रमाण वाढणार आहे. पुढील चार दिवस राज्यांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे, या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
advertisement
5/5
आज चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदियात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. वातावरण देखील ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather update : महाराष्ट्रातील 'या' भागांत आजही पावसाचा इशारा; जाणून घ्या कसं असेल वातावरण?