अबब! 416 टायर, 39M लांब! असा बाहुबली ट्रक कधी पाहिलाय का? 10 महिन्यांपासून चालतोय
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Sirsa Viral Bahubali Truck: रविंदर पांडेय यांनी सांगितलं की, हा ट्रक सिरसा जिल्ह्यात पोहोचला आहे. या ट्रकसोबत 25 ते 30 लाक चालत आहेत. जे हा ट्रक पुढे लोटण्यात लागले आहेत. हा ट्रक दररोज दिवसा चालतो आणि जवळपास 12 किलोमीटर अंतर पार करतो.
advertisement
1/6

सिरसा: तुम्ही तुमच्या आयुष्यात हायवेवर किती टायर असलेले ट्रक पाहिलेय? 6, 8, 10, 16... किंवा जास्त. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजकाल हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील रस्त्यांवर एक ट्रक आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलाय. मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक गुजरातमधील कांडला बंदरातून 10 महिन्यांपूर्वी निघाला होता, जो पंजाबमधील रिफायनरीमध्ये जाणार आहे. अनेकदा तुम्ही हायवेवर ट्रक धावताना पाहिला असेल, पण हा बाहुबली ट्रक धावत नाही तर रेंगाळत चाललाय.
advertisement
2/6
रस्त्यावरील बाहुबली ट्रकची भीती इतकी असते की, तो हलला की रस्ता मोकळा करावा लागतो. कारण त्याचा आकार आणि लांबी इतका आहे की हा बाहुबली ट्रक संपूर्ण रस्ता व्यापतो. हा ट्रक हायवेवरील फ्लायओवरवर धावत नाही तर खालून चालतो.
advertisement
3/6
या ट्रकच्या पुढे आणखी दोन ट्रक चालतात आणि काही लोकांची टीम रस्ता साफ करण्यासाठी धावते. ज्या रस्त्यावरुन ट्रक जाणार तो मार्ग काही काळ बंद करुन डाव्हर्ट केला जातो. हा ट्रक तेथून जाताच रोड पुन्हा क्लिअर करतात.
advertisement
4/6
ट्रकसोबत असलेले टेक्निकल इन्चार्ज रविंदर पांडे यांनी न्यूज 18 शी बोलताना सांगितले की, हा ट्रक पंजाबमधील रामा मंडी येथे बांधलेल्या रिफायनरीमध्ये जाणार आहे.
advertisement
5/6
या ट्रकवर एक इक्विपमेंट आहे. जी रिफायनरीमध्ये बसवायची आहेत. हा बाहुबली ट्रक ओढण्यासाठी दोन ट्रक समोरून तर एक ट्रक मागे धावतोय. या ट्रकमध्ये 416 टायर असून हा ट्रक 39 मीटर लांब आहे. त्यांनी सांगितले की, हा ट्रक गुजरातमधील कांडला बंदरातून 9-10 महिन्यांपूर्वी निघाला होता, वाटेत खराब हवामानामुळे तो थांबवावा लागला होता.
advertisement
6/6
रविंदर पांडे यांनी सांगितले की, आता ते सिरसा जिल्ह्यात पोहोचले आहे. येथून तो भटिंडा येथे बांधलेल्या रिफायनरीमध्ये जाईल. या ट्रकने 25 ते 30 जण प्रवास करत आहेत. जे हा ट्रक पुढे नेण्यात गुंतले आहेत. हा ट्रक दररोज धावतो आणि सुमारे 12 किलोमीटर अंतर कापतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
अबब! 416 टायर, 39M लांब! असा बाहुबली ट्रक कधी पाहिलाय का? 10 महिन्यांपासून चालतोय