TRENDING:

BJ Hostel Plane Crash: लंच ब्रेक, स्फोट अन् जळालेले मृतदेह, 'देवदूत' भरल्या ताटावरून सोडून गेले

Last Updated:
दुपारी नेहमीप्रमाणे सगळे जण हॉस्टेलच्या मेसमध्ये जेवणासाठी आले होते.आधीच काही जण जेवण करत होते. प्लेट्स वाढल्या जात होत्या. पण अचानक मोठा आवाज झाला आणि...
advertisement
1/7
लंच ब्रेक, स्फोट अन् जळालेले मृतदेह, 'देवदूत' भरल्या ताटावरून सोडून गेले
दुपारी नेहमीप्रमाणे सगळे जण हॉस्टेलच्या मेसमध्ये जेवणासाठी आले होते. आधीच काही जण जेवण करत होते. प्लेट्स वाढल्या जात होत्या. पण अचानक मोठा आवाज झाला आणि एका मोठ्या स्फोटासह एअर इंडियाचे ड्रीमलाइनर विमान मेसच्या छतावर कोसळलं. भिंत भेदून विमान मेसमध्ये आलं. काही कळायच्या आता आगडोंब उसळला. समोर जेवणारा जागेवर जळून कोळसा झाला तर विटांचे तुकडे काहींच्या चेहऱ्यावर तर काहींच्या डोक्यावर लागल्याने अनेक जण ी जखमी झाले. काही बेशुद्ध पडले. काही जणांनी जागीच जीव सोडला. हे दृश्य होतं अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान ज्या हॉस्टेलवर कोसळलं त्या मेसमधलं.
advertisement
2/7
अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाचं AI171 हे विमान अहमदाबादहून लंडनला निघालं होतं. टेक ऑफ केल्यानंतर दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी हे विमान रहिवासी भागात कोसळलं. विमानतळाच्या धावपट्टीपासून काही अंतरावर मेघानी नगर आहे. त्या ठिकाणी बिजे हॉस्पिटलची मेस आहे. या मेसवरच हे विमान कोसळलं.
advertisement
3/7
जेव्हा विमान कोसळलं तेव्हा आजूबाजूला फक्त धूर होता. गोंधळ होता. सुरुवातीला असं वाटलं की कदाचित बॉम्बस्फोट झाला असेल. सर्व विद्यार्थी इकडे तिकडे धावत होते. नंतर विमान कोसळल्याचं कळलं. यावेळी समोर आलेले फोटो पाहिले तर विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या प्लेट्स टेबलावर तशाच पडलेल्या आहे.
advertisement
4/7
तांदूळ, डाळ, रोटी, सर्वकाही तसंच आहे जणू कोणीतरी अचानक अन्न मध्येच सोडलं आहे. विमानाच्या शेपटीचा भाग भिंतीला फोडून आत शिरला होता.
advertisement
5/7
दुपारच्या वर्गानंतर बहुतेक विद्यार्थी जेवणासाठी मेसमध्ये आले होते. काही थकले होते, तर काही घाईत होते. त्यानंतर अचानक मेसचे छताला हादरा बसला आणि मोठा स्फोट झाला. विद्यार्थ्यांनी सांगितले की सुरुवातीला त्यांना काहीही समजलं नाही, परंतु काही सेकंदातच धूळ, धूर आणि ढिगारा पसरला.
advertisement
6/7
मेसच्या मागील भागात असलेल्या काही विद्यार्थ्यांनी ढिगाऱ्याजवळ पोहोचून अडकलेल्या मित्रांना बाहेर काढण्यास मदत केली. हॉस्टेल कर्मचारी आणि जवळचे लोकही मदतीसाठी धावले. आतापर्यंत डझनभर जखमींना बीजे मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
advertisement
7/7
मेडिकल कॉलेजची ही दुपार अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात भयानक वेळ बनली. जे विद्यार्थी फक्त जेवणासाठी बसले होते, त्यातील 25 जण जग सोडून गेले आहे. घटनास्थळी जिकडे जिकडे जळालेले मृतदेह आणि ढिगारा अशीच स्थिती आहे. अग्निशमन दलाचे जवानांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
BJ Hostel Plane Crash: लंच ब्रेक, स्फोट अन् जळालेले मृतदेह, 'देवदूत' भरल्या ताटावरून सोडून गेले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल