Milk Interesting Fact : दुधात साय येते कुठून, ती कशी तयार होते?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Milk Fat Cream Interesting Fact : दूध आपण आणतो तेव्हा त्यात काहीच नसतं पण ते गरम करतो तेव्हा वर साय येते, ती कशी काय? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
1/5

दूध गरम केलं की त्यावर एक जाडसर थर आपल्याला दिसतो, ज्याला आपण साय किंवा मलाई म्हणतो. आधी दुधात साय नसते. पण ते गरम केल्यावर त्यात साय कुठून येते, असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल.
advertisement
2/5
दुधात साय येण्याची प्रक्रिया अगदी नैसर्गिक आहे आणि त्यामागे दुधातील चरबीचं शास्त्रीय कारण दडलेलं आहे. दुधात पाणी, प्रोटीन, लॅक्टोज तसंच ठराविक प्रमाणात चरबी असते. दूध उकळल्यावर त्यातील प्रोटीन आणि चरबी एकत्र येऊन पातळ पडदा तयार करतात.
advertisement
3/5
जेव्हा दूध थंड होऊ दिलं जातं, तेव्हा हा पडदा जाड होत जातो आणि दुधातील चरबीचे कण पाण्यापेक्षा हलके असल्यामुळे दूध उकळून थंड झाल्यावर हे कण वरच्या बाजूस सायीच्या स्वरूपात जमा होतात.
advertisement
4/5
म्हशीच्या दुधात चरबीचं प्रमाण जास्त असल्याने त्यात साय जास्त प्रमाणात दिसते, तर गायीच्या दुधात साय तुलनेने कमी असते. टोंड किंवा डबल-टोंड दुधात तर चरबी खूपच कमी असल्याने साय जवळपास येतच नाही.
advertisement
5/5
साय बनण्याची नैसर्गिक प्रक्रिया केवळ चवीसाठीच नाही, तर पौष्टिकतेच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. सायीत व्हिटॅमिन ए, डी, ई, के आणि आणि गूड फॅट असतं, जे शरीरासाठी उपयुक्त ठरतं.