PHOTOS : कोण आहे फुटीरतावादी नेता यासिन मलिकची पत्नी मुशाल, पाकिस्तानात होणार मंत्री
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
Yasin Malik Wife : काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासीन मलिक याची पत्नी मुशाल हुसैन मलिक हिची पाकिस्तानमध्ये जोरदार चर्चा होत आहे. एनआयए कोर्टात टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरल्यानंतर यासीन मलिक सध्या तुरुंगात आहे. पण, सध्या त्याची पत्नी मुशाल हुसैन मलिकची मोठी चर्चा होत आहे. याचे कारणही तसेच आहे. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांच्या मंत्रिमडंळात मुशाल हुसैन मलिक यांना मानवाधिकार आयोगाची जबाबदारी मिळणार आहे. सुरुवातीपासूनच भारताविरुद्ध भूमिका घेणारी मुशाल, हिचा जन्म कुठे झाला, यासिन मलिक आणि तिची भेट कशी झाली, ती आता पाकिस्तानात काय करतेय याबाबत जाणून घेऊयात.
advertisement
1/7

टेरर फंडिंग प्रकरणात तुरुंगात असलेला त्यांचा पती यासिन मलिक निर्दोष असल्याचे जाहीर करून मुशाल मलिक यांनी पाकिस्तान सरकारला भारताविरुद्ध कारवाई करण्याचे आवाहन केले. मुशाल मलिक या सुरुवातीपासूनच कट्टर भारतविरोधी राहिल्या आहेत. त्यांनी अनेक प्रसंगी पाकिस्तान आणि जागतिक संघटनेला भारताच्या विरोधात उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
2/7
मुशाल यांचा जन्म पाकिस्तानात झाला आहे. त्यांचे वडील जगप्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत. तसेच त्यांची आई यापूर्वी मुस्लिम लीगच्या युनिटमध्ये काम करत होत्या. तसेच मुशाल यांचा भाऊ अमेरिकेत प्राध्यापक आहेत. त्या स्वतः एक प्रसिद्ध चित्रकार आहेत.
advertisement
3/7
मुशाल आणि यासीन या दोघांची भेट इस्लामाबादमध्ये 2005 साली झाली होती. एका कार्यक्रमात काश्मिरी फुटीरतावादी चळवळीला पाठिंबा मिळवण्यासाठी यासीन तिथे गेला होता. याठिकाणी या दोघांची भेट झाली.
advertisement
4/7
इस्लामाबादमधील या कार्यक्रमात मुशालही आल्या होत्या. यासीन मलिकने फैज अहमद फैज यांची "हम देखेंगे" ही कविता ऐकवल्यावर मुशाल या वयाने 20 वर्षे मोठ्या असलेल्या यासिनच्या प्रेमात पडल्या. यानंतर 2009 मध्ये दोघांनी लग्न केले.
advertisement
5/7
मुशाल सध्या पाकिस्तानच्या पीस अँड कल्चर ऑर्गनायझेशनच्या अध्यक्ष आहेत. त्यांची ही संघटना जागतिक शांतता आणि सौहार्दासाठी तसेच संस्कृती आणि वारशाचे रक्षण करत असल्याचा दावा करते.
advertisement
6/7
यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात मागच्या वर्षी 24 मे रोजी एनआयए कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यासीनला ट्रायल कोर्टाने UAPA च्या कलम 121 आणि कलम 17 (टेरर फंडिंग) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
advertisement
7/7
यावर यासिन आणि मुशाल यांची 11 वर्षांची मुलगी सुलतानाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) संसदेत संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधा भाष्य केले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
PHOTOS : कोण आहे फुटीरतावादी नेता यासिन मलिकची पत्नी मुशाल, पाकिस्तानात होणार मंत्री