Success Story : वडिलांचं छोटसं किराणा दुकान, मुलगी आधी इंजिनियर नंतर आयएएस; असा आहे यशाचा फॉर्म्युला
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
एका छोट्या शहरामध्ये राहुन आपलं लक्ष्य साध्य करणं ही सोपी गोष्ट नसते. या प्रवासात तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र त्यावर मात केल्यानंतर यश हे तुम्हाला मिळतंच.
advertisement
1/5

Ayushi Jain Gurdhani IAS Success Story:एका छोट्या शहरामध्ये राहुन आपलं लक्ष्य साध्य करणं ही सोपी गोष्ट नसते. या प्रवासात तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र तुम्ही जर या अडचणींचा सामना केला तर तुम्ही तुमचं ध्येय नक्कीच गाठू शकता. ही गोष्ट आहे. आयुषी जैन गुरधानी यांची. त्या मध्य प्रदेशातील विदशा जिल्ह्यातल्या सिरोंज या छोट्याशा शहरातील रहिवासी आहेत.
advertisement
2/5
Ayushi Jain Gurdhani IAS Education: आयुषी जैन गुरधानी यांचे वडील एका छोट्याशा किराणा दुकानाचे मालक आहेत. तर त्यांची आई गृहिणी आहे. आयुषी यांना दोन छोटे बहिण-भाऊ देखील आहेत. आयुषी या सुरुवातीपासूनच अभ्यासामध्ये हुशार होत्या. त्यांनी दहावीमध्ये 91.2 टक्के तर बारावीमध्ये 90.4 टक्के मार्क मिळवले. त्यानंतर त्यांनी भोपाळच्या लक्ष्मी नारायण कॉलेजमधून आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं.
advertisement
3/5
Private Job vs Govt Job:इंजिअरिंगनंतर आयुषी यांनी दोन वर्ष एका खासगी कंपनीमध्ये जॉब केला. त्यानंतर त्यांनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी युपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन एक वर्ष दिल्लीमध्ये युपीएससीचा अभ्यास केला. मात्र पहिल्या प्रयत्नात त्यांनी युपीएससीची पूर्व परीक्षा देखील पास करता आली नाही.
advertisement
4/5
Ayushi Jain UPSC: पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर त्यांनी आपल्या स्टॅटजीमध्ये बदल केला. त्याचा फायदा त्यांना झाला, यावेळी आयुषी या युपीएससीच्या पूर्व परीक्षेत पास झाल्या मात्र मेन परीक्षेत त्यांना अपयश आलं. सलग दोन वेळी अपयश आल्यानं त्या निराश झाल्या, मात्र त्यांनी हार मानली नाही, यावेळी प्री परीक्षा पास केल्यानंतर त्यांनी मॅथ ऐवजी मेन्ससाठी मानववंशशास्त्र या विषयाची निवड केली.
advertisement
5/5
Ayushi Jain Gurdhani IAS Rank: विषयामध्ये केलेला बदल त्यांना फायद्याचा ठरला. दोन प्रयत्नानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी प्री, मेन्स आणि मुलाखत अशा तिनही ठिकाणी यश मिळवलं. त्यांना युपीएससी परीक्षेत 2019 मध्ये 41 वी रॅंक मिळाली. त्या आयएएस ऑफिसर झाल्या, त्यांना आपली पहिली पोस्टिंग आसाममध्ये मिळाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/फोटो गॅलरी/
Success Story : वडिलांचं छोटसं किराणा दुकान, मुलगी आधी इंजिनियर नंतर आयएएस; असा आहे यशाचा फॉर्म्युला