Sweet Potato Benifits: श्रावणात साबुदाना-भगर खाऊन कंटाळलात? पौष्टिक कंदमुळातून मिळतील असंख्य फायदे
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
Sweet Potato Benifits: सध्या श्रावण महिना सुरू आहे. या पवित्र महिन्यात अनेकजण उपवास करतात. उपवासासाठी प्रामुख्याने भागर आणि साबुदाण्याचं सेवन केलं जातं. मात्र, हे पदार्थ वारंवार खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. अशा वेळी रताळी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. रताळी खाल्ल्याने उपवास तर घडतोच शिवाय आरोग्याची देखील काळजी घेतली जाते. कारण, रताळी मानवी आरोग्यासाठी अतिशय चांगली मानली जातात.
advertisement
1/5

रताळी खाल्ल्याने व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन सी असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत होते. 124 ग्रॅम रताळ्यात 12.8 मिलिग्रॅम व्हिटॅमीन सी असते. परिणामी रोगप्रतिकारक शक्ती वाढवून अनेक आजारांना दूर ठेवता येतं. विशेषत: हिवाळ्यामध्ये रताळी फारच लाभदायक ठरतात.
advertisement
2/5
प्राचीन काळापासून कंदमूळ म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या रताळ्यामुळे डोळ्याचं आरोग्य सुधारतं. रताळ्यात व्हिटॅमीन ए आणि बीटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे युव्ही किरणांपासून संरक्षण होण्यास मदत होते आणि मानवी दृष्टी सुधारण्यास मदत होते.
advertisement
3/5
पचनशक्ती सुधारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी रताळी उत्तम पर्याय ठरू शकतात. आहारात रताळी घेतल्याने पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. रताळ्यातील फायबर पचन प्रणाली सुधारण्यास मदत करते. सोबतच पोटदुखी, पित्त आणि जुलाब सांरख्या समस्यांपासून बचाव देखील येतो.
advertisement
4/5
अनेकांना असा गैरसमज आहे की, रताळी खाल्ल्याने वजन वाढते. प्रत्यक्षात वजन कमी करण्यासाठी रताळी खूप फायदेशीर आहेत. ज्या व्यक्ती वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी रताळी अतिशय चांगला पर्याय आहे. रताळे खाल्ल्यानंतर सारखी भूक लागत नाही. त्यामुळे वजन घटण्यास मदत होते.
advertisement
5/5
आहारतज्ज्ञांच्या मते रताळी सुपरफूड आहे. 200 ग्रॅम रताळ्यांमध्ये 4 ग्रॅम प्रोटीन असते. शिवाय अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स देखील असतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी रताळी हा पौष्टीक पर्याय ठरू शकतो. रताळ्यांपासून शिरा, टिक्की आणि थालीपीठ यांसारखे विविध उपवासाचे पदार्थ तयार करता येतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/फोटो गॅलरी/
Sweet Potato Benifits: श्रावणात साबुदाना-भगर खाऊन कंटाळलात? पौष्टिक कंदमुळातून मिळतील असंख्य फायदे