TRENDING:

Weather Alert: वारं फिरलं! विदर्भात उघडीप, आता या भागात धो धो कोसळणार, 12 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. विदर्भातील पावसाचा जोर ओसरला असून आता 12 जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
advertisement
1/7
वारं फिरलं! विदर्भात उघडीप, आता या भागात धो धो कोसळणार, 12 जिल्ह्यांना अलर्ट
राज्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. गेल्या काही काळात कोकणसह विदर्भात मान्सूनने जोरदार हजेरी लावली. तर मागील 3-4 दिवसांत कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर ओसरला होता. पुढील 24 तासांत राज्यातील 12 जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
2/7
पुढील 24 तासात कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने 24 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानंतर पुन्हा पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी आकाश ढगाळ राहील. तर अधुनमधून हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मुंबई वगळता कोकणातील सर्व जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला असून जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/7
पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर मध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
advertisement
6/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ढगाळ आकाश राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. इतर जिल्ह्यांना आज कोणताही सतर्कतेचा इशारा नाही.
advertisement
7/7
विदर्भातून पावसाने काढता पाय घेतला आहे. त्यामुळे विदर्भात सामान्यतः ढकळ आकाश राहणार असून पावसाची उघडी पाहायला मिळणार आहे. पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा कोणताही इशारा दिलेला नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: वारं फिरलं! विदर्भात उघडीप, आता या भागात धो धो कोसळणार, 12 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल