TRENDING:

Weather Alert: कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट, 25 जिल्ह्यांत धो धो कोसळणार, 8 जुलैचा हवामान अंदाज

Last Updated:
Weather Alert: राज्यात गेल्या काही काळात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील 24 तासांसाठी 25 जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
1/7
कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट, 25 जिल्ह्यांत धो धो कोसळणार, 8 जुलैचा हवामान अंदाज
राज्यात गेल्या काही काळात पावसाची तीव्रता वाढली आहे. कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात पावसाचे धुमशान सुरू आहे. विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांत 7 जुलै रोजी अतिवृष्टी झाली. पुढील 24 तासांत पुन्हा पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे. 8 जुलै रोजी राज्यातील पावसाची स्थिती आणि हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाश राहील आणि तुरळक मध्यम पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाने पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आह.
advertisement
3/7
उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर वगळता सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्‍यता आहे. पुणे आणि कोल्हापूर घाट भागात जोरदार पावसाची शक्यता असून याठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. तर साताऱ्यातील घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असेल.
advertisement
5/7
मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असून पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या सहा जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होईल. परभणी आणि नांदेडच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो.
advertisement
6/7
विदर्भामध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या आठ जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर अकोला जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
7/7
दरम्यान, 8 जुलै रोजी 25 जिल्ह्यांत जोरदार पाऊस होणार असून विदर्भात पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे. पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट, 25 जिल्ह्यांत धो धो कोसळणार, 8 जुलैचा हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल