TRENDING:

Weather Alert: दिवाळीआधी हवामानात मोठे बदल, पश्चिम महाराष्ट्राचा पारा चढला, रविवारचं अपडेट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत असून ऑक्टोबरमध्ये तापमानात मोठी वाढ झालीये. पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/7
दिवाळीआधी हवामानात मोठे बदल, पश्चिम महाराष्ट्राचा पारा चढला, रविवारचं अपडेट
महाराष्ट्रातून मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. पावसाने उघडीप दिली असल्याने राज्यात 'ऑक्टोबर हीट’चा चटका वाढला आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 32 अंशांच्या पार असून आज 12 ऑक्टोबर रोजी राज्यात पावसाच्या उघडिपीसह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात शनिवारी 32.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज पुणे जिल्ह्यात दिवसभर निरभ्र आकाशासह रात्री अंशतः ढगाळ आकाश राहील. यावेळी कमल तापमानात अंशतः वाढ होऊन पारा 33 अंशावर राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
मागील 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 31.7 अंश सेल्सिअस इतके राहीले. आज संपूर्ण साताऱ्यासह सातारा घाटमाथ्यावर अंशतः ढगाळ आकाश होवून पारा 30 अंशावर राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी 30.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर आकाश निरभ्र राहील. यावेळी कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस इतके राहिल.
advertisement
5/7
शनिवारी सोलापूर जिल्ह्यात 34.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची राज्यातील उच्चांकी नोंद झाली. आज सोलापूर जिल्ह्यात निरभ्र आकाशाची शक्यता कायम आहे. यावेळी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस इतके राहिल.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 32.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रविवारी जिल्ह्यात निरभ्र आकाशासह पारा 33 अंशावर पोहचण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
7/7
राज्यात आज मुख्यतः उघडिपीसह उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. पावसाच्या उघडीपीने शेतीच्या कामांनी गती घेतली आहे. मात्र पारा वाढल्याने ‘ऑक्टोबर हीट'चा चटका त्रासदायक ठरत आहे. पुढील दोन दिवसात संपूर्ण राज्यातून मान्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: दिवाळीआधी हवामानात मोठे बदल, पश्चिम महाराष्ट्राचा पारा चढला, रविवारचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल