TRENDING:

Weather Alert: पुणे ते सोलापूर पावसाचा धुमाकूळ, रविवारी सोसाट्याचा वारा, IMD कडून अलर्ट

Last Updated:
Weather alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. आज सोलापूरसह पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
1/7
पुणे ते सोलापूर पावसाचा धुमाकूळ, रविवारी सोसाट्याचा वारा, IMD कडून अलर्ट
राज्यात गेल्या काही दिवसांत पावसाची तीव्रता वाढली आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस सुरू आहे. आज 21 सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात 0.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानाचा पारा 29.7 अंश सेल्सिअस इतका राहिला. आज पुणे जिल्ह्यात आकाश ढगाळ राहिल. तसेच विजांसह जोरदार पावसाची शक्‍यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची उघडीप राहिली. आज कमाल तापमान 30.4 अंश सेल्सिअस राहिल. पुढील 24 तासात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. साताऱ्याला आज कोणताही महत्त्वाचा अलर्ट नसला तरी ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होईल. तसेच 24 तासानंतर पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 29.2 अंश सेल्सिअस राहिले. आज जिल्ह्यात कमाल तापमान 26 अंशावर राहिल. तर पुढील 24 तास कोल्हापूर जिल्ह्यात अंशत: ढगाळ वातावरण राहून एक दोन वेळा गडगडाटी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्हात मागील 24 तासात 2 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. तसेच शनिवारी सोलापूर जिल्ह्यात 31.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 31 अंशावर राहिल. तसेच विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
6/7
गेल्या 24 तासात सांगली जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडीप राहिली. उन्हाच्या चटक्यासह तापमान 30.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. आज रविवार सांगली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगवान वारे वाहतील.
advertisement
7/7
पुढील 24 तास राज्यात काही भागात पावसाचे वातावरण कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत कमी अधिक पावसाची शक्यता असली तरी पुणे आणि सोलापुरात जोर अधिक राहील. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांना सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पुणे ते सोलापूर पावसाचा धुमाकूळ, रविवारी सोसाट्याचा वारा, IMD कडून अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल