Weather Alert: 24 तास महत्त्वाचे! सोलापुरात पावसाचं तुफान, पुण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather alert: महाराष्ट्रात पावसाचं धुमशान सुरू असून पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. आज पुन्हा सोलापूर, पुणे जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7

राज्यातील बहुतांश भागात विजा, मेघगर्जनेसह धो धो पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर आहे. आज पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 24 सप्टेंबर रोजीचा जिल्ह्यानिहाय हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात 15.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानाचा पारा 25.7 अंश सेल्सिअस इतका राहिला. आज पुणे जिल्ह्यात आकाश ढगाळ राहिल. तसेच विजांसह जोरदार पावसाची शक्‍यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यात मंगळवारी 8 मिलिमीटर पावसाची नोंद राहिली. आज साताऱ्यातील कमाल तापमान 25.2 अंश सेल्सिअस राहिल. पुढील 24 तासात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. साताऱ्यात विजांसह वादळी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 0.3 मिलिमीटर पाऊस नोंद झाला. आज कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 27 अंशावर राहिल. तसेच पुढील 24 तास कोल्हापूर जिल्ह्यात अंशत: ढगाळ वातावरण राहून गडगडाटी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्हात मागील 24 तासात 29 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. पुढील 24 तासात कमाल तापमान 32 अंशावर राहिल. तसेच विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे सीना आणि भोगावती नद्यांना पूर आला आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले असून पुणे-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे.
advertisement
6/7
मागील 24 तासात सांगली शहर परिसरात पावसाने विश्रांती घेतली. ढगाळ आकाशासह तापमान 26.7 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. आज बुधवारी सांगली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. विशेषत: सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक आहे. सोलापुरात नद्यांना पूर आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: 24 तास महत्त्वाचे! सोलापुरात पावसाचं तुफान, पुण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट