TRENDING:

Weather Alert: मान्सूनची माघार! पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल, आता नवं संकट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून मान्सूनने माघार घेतल्याचे चित्र आहे. पुणे ते सोलापूर 5 जिल्ह्यांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/7
मान्सूनची माघार! पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल, आता नवं संकट
महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असून राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे. आज 10 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात गुरुवारी 12.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी 31.9 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहिले. आज पुणे जिल्ह्यात हलक्या पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
3/7
गेल्या 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 30.2 अंश सेल्सिअस इतके राहीले. तसेच 7 मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला. आज संपूर्ण साताऱ्यासह सातारा घाटमाथ्यावर विजांसह पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात गरुवारी 6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर गडगडाटी वादळासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात हलका पाऊस राहिला. यावेळी 33.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज सोलापूर जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 36 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस इतके राहिले. तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. पुढील 24 तासात जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली असून मुसळधार पावसाचा कोणताही सतर्कतेचा इशारा दिलेला नाही. अशातच पश्चिम महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचे चटके जाणवत असून तापमानाचा पारा तिशीपार गेला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: मान्सूनची माघार! पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल, आता नवं संकट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल