TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रावर अजूनही अस्मानी संकट दूर नाहीच! 4 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
कोकणामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुढील काही तासांसाठी कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्रावर अजूनही अस्मानी संकट दूर नाहीच! 4 जिल्ह्यांना अलर्ट
राज्यातील पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र कोकणामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुढील काही तासांसाठी कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/7
पुण्याच्या आणि साताऱ्याच्या घाट भागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाहुयात 22 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
3/7
22 ऑगस्ट रोजी मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ आकाश राहणार असून मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस असेल. रायगड आणि रत्नागिरीला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केलाय.
advertisement
4/7
पुण्याच्या घाट भागाला हवामान विभागाने 22 ऑगस्ट रोजीसाठी देखील यलो अलर्ट जारी केला आहे. तर पुण्यामध्ये साधारणपणे ढगाळ आकाश राहणार असून हलका पाऊस होऊ शकतो, तर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढे असेल.
advertisement
5/7
छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे ढगाळ आकाश राहणार असून हलका पाऊस होऊ शकतो, तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढे असेल. तर नाशिकमध्ये 22 ऑगस्ट रोजी सामान्यतः ढगाळ आकाश राहील, तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
6/7
नाशिकमधील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढे असेल, तर नागपूरमध्येही 22 ऑगस्ट रोजी सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढे असेल. काही ठिकाणी हलक्या पावसाची देखील शक्यता आहे.
advertisement
7/7
24 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो. कोकण किनारपट्टीवरील काही जिल्हे बघता राज्यावर पुढील काही दिवस उघडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रावर अजूनही अस्मानी संकट दूर नाहीच! 4 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल