TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रातून आता पावसाची एक्झिट, पण येणार नवं संकट, हवामान खात्याकडून अपडेट!

Last Updated:
राज्यात पुढील 24 तासांमध्ये म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी बहुतांश भागांत कोरडे हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्रातून आता पावसाची एक्झिट, पण येणार नवं संकट, हवामान खात्याकडून अपडेट!
राज्यात पुढील 24 तासांमध्ये म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी बहुतांश भागांत कोरडे हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर काही प्रमुख शहरांतील तापमानात घट दिसून येत असल्याने थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. पाहुयात 11 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये 11 ऑक्टोबर रोजी कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. मुंबईत किमान तापमान 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस इतके नोंदवले जाण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांत कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. पुण्यात तापमान 20 ते 33 अंश सेल्सिअस दरम्यान असू शकतं. तर कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत कोरडे हवामान राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील तापमान 17 ते 33 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या भागात सकाळच्या सुमारास हलका थंडावा जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये किमान तापमान 16 अंश सेल्सिअस आणि कमाल 33 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. तापमानात घट झालेली दिसून येत असल्याने या भागात थंडीची चाहूल लागण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतही कोरडे हवामान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूरमध्ये तापमान 21 ते 33 अंश सेल्सिअस दरम्यान असू शकतं.
advertisement
7/7
राज्यातील बहुतांश भागांत कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच काही जिल्ह्यांतील तापमानात घट झाल्यामुळे हवेतील गारवा वाढण्याची शक्यता आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील भागात अधूनमधून हलक्या सरींची शक्यता असली, तरी मोठ्या प्रमाणावर पावसाचा अंदाज नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रातून आता पावसाची एक्झिट, पण येणार नवं संकट, हवामान खात्याकडून अपडेट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल