Weather Alret : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे, पुन्हा बर्फासारखी थंडी पडणार, हवामान खात्याचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
गेले चार दिवस राज्यात थंडीची लाट होती. 14 डिसेंबरपासून राज्यातील थंडीची लाट ओसरली, तरीही थंडीचा कडाका कायम आहे. तसेच पुढील काही दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
1/7

गेले चार दिवस राज्यात थंडीची लाट होती. 14 डिसेंबरपासून राज्यातील थंडीची लाट ओसरली, तरीही थंडीचा कडाका कायम आहे. तसेच पुढील काही दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. जेऊर येथे राज्यातील सर्वात कमी 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच इतरही जिल्ह्यांत 10 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवले गेले. पाहुयात, 16 डिसेंबर रोजी राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
मुंबईसह उपनगरांत निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. कोकण विभागात तापमानात वाढ दिसून येत आहे. काही जिल्ह्यांत 34 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम आहे. प्रमुख शहर असलेल्या पुणे येथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. पुण्यात मुख्यतः निरभ्र आकाश राहून वातावरण कोरडे असणार आहे. इतर जिल्ह्यांतही काहीशी अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यात देखील हुडहुडी कायम आहे. प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 डिसेंबर रोजी निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. तसेच मराठवाड्यातील इतरही जिल्ह्यांत अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जास्त आहे. नाशिकमधील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी निरभ्र आकाश राहून वातावरण कोरडे असणार आहे. इतरही जिल्ह्यांतील तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यांत 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
6/7
विदर्भातही थंडीचा कडाका वाढलाय. विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूर येथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश राहून वातावरण कोरडे असणार आहे. विदर्भातील गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांत 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे.
advertisement
7/7
राज्यात थंडीची लाट ओसरली असली तरी थंडीचा कडाका कायम आहे, त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात. तसेच तूर पिकांवरही रोग पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगून काळजी घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alret : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे, पुन्हा बर्फासारखी थंडी पडणार, हवामान खात्याचा अलर्ट