Weather Alert : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, आता गारवा वाढणार, रविवारी कसं असेल हवामान?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
मागील काही दिवसात राज्यातील पावसाचे प्रमाण देखील कमी झाले आहे आणि राज्यामध्ये कोरडे हवामान पाहायला मिळत आहे.
advertisement
1/8

नैऋत्य मान्सूनने राज्यामधून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईसह उत्तर महाराष्ट्र आणि राज्यातील उत्तरेकडील जिल्ह्यातून मान्सूनने काढता पाय घेतला असून आगामी एक-दोन दिवसांमध्ये संपूर्ण राज्यातून मान्सून माघारी फिरेल. मागील काही दिवसात राज्यातील पावसाचे प्रमाण देखील कमी झाले आहे आणि राज्यामध्ये कोरडे हवामान पाहायला मिळत आहे.
advertisement
2/8
दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस वगळता संपूर्ण राज्यामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान पाहायला मिळत आहे. आणि हेच वातावरण पुढील पाच दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. पाहुयात 12 ऑक्टोबर रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
3/8
मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ आकाश राहणार असून कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल. किमान तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने वातावरणात गारवा जाणवू शकतो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुरळक पावसाची देखील शक्यता आहे.
advertisement
4/8
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूरमध्ये अधून मधून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस पर्यंत तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/8
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर या पाचही जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाशाने कोरडे हवामान पाहायला मिळेल. तर किमान तापमानात लक्षणीय घट होणार असून ते केवळ 17 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा जोर वाढल्याचं पाहायला मिळू शकतं.
advertisement
6/8
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या आठही जिल्ह्यांमध्ये 16 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान पाहायला मिळेल. 16 ऑक्टोबर नंतर मात्र विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता मराठवाड्यामध्ये आहे.
advertisement
7/8
मराठवाड्याप्रमाणेच विदर्भामध्ये देखील पुढील चार ते पाच दिवस स्वच्छ सूर्यप्रकाशाने कोरडे हवामान पाहायला मिळणार असून कमाल तापमान हे 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तर दिवाळीच्या पूर्वसंध्येला 16, 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे.
advertisement
8/8
दरम्यान, नैऋत्य मान्सून राज्यातून माघारी फिरल्यानंतरही दक्षिण भारतामध्ये ईशान्य मान्सूनचा पाऊस होत असतो. या पावसाचा परिणाम म्हणून राज्यामध्ये देखील पावसाच्या हालचाली आगामी काळात पाहायला मिळू शकतात. दिवाळीच्या आसपास राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचे ढग दाटून येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, आता गारवा वाढणार, रविवारी कसं असेल हवामान?