Pune Weather Update : पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा वादळी पाऊस, 2 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
दोन्ही समुद्रात घोंघावत असलेल्या कमी दाब प्रणालींच्या प्रभावामुळे राज्यात पावसाने तडाखा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/7

दोन्ही समुद्रात घोंघावत असलेल्या कमी दाब प्रणालींच्या प्रभावामुळे राज्यात पावसाने तडाखा दिला आहे. आज दिनांक 27 ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात रविवारी 30.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 29 अंशावर राहील. दक्षतेचा यलो अलर्ट आयएमडीकडून देण्यात आला आहे.
advertisement
3/7
मागील 24 तासात सातारा जिल्ह्यात 28 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची तसेच 0.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज संपूर्ण साताऱ्यासह घाटमाथ्यावर विजांसह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 28 अंशावर राहील.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात काल रविवार 28 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच 0.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आयएमडीकडून देण्यात आली आहे. यावेळी विजांचा कडकडाटासह 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगवान वारे असेल.
advertisement
5/7
रविवारी सोलापूर जिल्ह्यात 31.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी पारा 31 अंशावर राहण्याचा अंदाज आहे. पुढील 24 तासांसाठी दक्षतेचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 30 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी पारा 27 अंशावर राहण्याचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
7/7
आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात विजांसह गडगडाटी पावसाची शक्यता आहे. तसेच उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमान 29 अंशापार राहत असून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यास विजांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Weather Update : पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा वादळी पाऊस, 2 जिल्ह्यांना यलो अलर्ट