Ganesh Visarjan 2025: गणपती बाप्पासाठी व्हेल मासा, पुण्यातील मंडळाचा आकर्षक मिरवणूक रथ, खास PHOTOS
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
शनिपार गणेश मंडळ हे आकर्षक मिरवणूक रथासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी आकर्षक संकल्पना राबवत भाविकांचे लक्ष वेधून घेते.
advertisement
1/5

पुणे शहरात लाडक्या गणरायांना निरोप देण्यासाठी पुणेकरांनी जय्यत तयारी केली आहे. गुजरात गणरायांना निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात रथाची सजावट केली जाते. विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळ नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मिरवणूक रथाची आरास करतात.
advertisement
2/5

शहरातील शनिपार गणेश मंडळ हे आकर्षक मिरवणूक रथासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी आकर्षक संकल्पना राबवत भाविकांचे लक्ष वेधून घेते. शनिपार गणेश मंडळाकडून या वर्षी व्हेल मासाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या व्हेल मासा रथावर गणपती बाप्पांची मिरवणूक निघणार आहे.
advertisement
3/5
व्हेल मासा रथ घडवताना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. त्यासाठी लाकूड, फायबर, थर्माकोल अशा विविध गोष्टींचा वापर करून रंगीबेरंगी सजावट करण्यात आली आहे.
advertisement
4/5
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले की, यावर्षीची संकल्पना ही सागरी जलविविधतेशी जोडली गेलेली आहे. समुद्रातील जैवविविधता आणि त्याचे रक्षण करण्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
advertisement
5/5
मुंबई येथील प्रसिद्ध कलाकार महेंद्र पोतदार यांनी हा व्हेल मासा मिरवणूक रथ साकारला आहे. मागील दोन महिन्यांपासून रथ बनवण्याचे काम महेंद्र पोतदार आणि त्यांच्या टीमकडून करण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Ganesh Visarjan 2025: गणपती बाप्पासाठी व्हेल मासा, पुण्यातील मंडळाचा आकर्षक मिरवणूक रथ, खास PHOTOS