Teachers Day 2025: जे कुणाला नाही जमलं ते ट्रान्सजेंडर आाम्रपालीने करून दाखवलं, 1087 मुलांची झाली आई-बाबा!
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
Teachers Day 2025: शिक्षक दिनी पुण्यातील तृतीयपंथी शिक्षेकच्या कार्याला तुम्ही देखील सलाम कराल. एका घटनेतून प्रेरणा घेत आम्रपाली यांनी भीक मागणाऱ्या मुलांना शिकवण्याचा ध्यास घेतला.
advertisement
1/7

ट्रान्सजेंडर हा शब्द ऐकताच अनेकांच्या डोळ्यासमोर रस्त्यावर टाळ्या वाजवत पैसे मागणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा उभी राहते. पण हीच प्रतिमा मोडीत काढत ट्रान्सजेंडर डॉ. आम्रपाली मोहिते सिग्नलवर भीक मागणाऱ्या आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसाठी फुटपाथवर शाळा चालवतात.
advertisement
2/7
पुण्यातील सहा ठिकाणी या ‘फुटपाथ शाळा’ भरवल्या जातात. त्यांच्या या उपक्रमातून अनेक मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम झालं आहे. त्यांच्या या कार्याविषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
advertisement
3/7
डॉ. आम्रपाली मोहिते यांचं M.A. इकॉनॉमिक्स पर्यंत शिक्षण झालेलं आहे. त्यानी सांगितलं की, विमाननगरमध्ये शॉपिंगला गेले असताना काही मुलं त्याच्याकडे पैसे मागायला आली. त्यानी त्या मुलांना थोडे पैसे दिले. पण त्यानंतर ती मुलं दुसऱ्या व्यक्तीकडे गेल्यावर त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली. हे पाहून त्यांना खूप वाईट वाटलं आणि यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असा निर्णय त्यांनी घेतला. यातूनच फुटपाथ शाळेची सुरुवात झाली.
advertisement
4/7
डॉ. आम्रपाली मोहिते यांचा फुटपाथ शाळेचा उपक्रम टप्प्याटप्प्याने राबवला जातो. सुरुवातीला त्या मुलांच्या पालकांशी संवाद साधून मुलं रस्त्यावर राहणं किती असुरक्षित आहे हे समजावून सांगतात. त्यानंतर चाइल्ड वेल्फेअर कमिटीच्या मदतीने मुलांना निवासी शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न होतो.
advertisement
5/7
पालक तयार नसतील, तर शासकीय शाळेत मुलांना घालण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे सकाळी ते शाळेत जाऊन संध्याकाळी घरी परतू शकतात. पण या दोन्ही पर्यायांना जर पालक नकार देत असतील, तर शिक्षण थेट त्या मुलांपर्यंत पोहोचवले जाते.
advertisement
6/7
रस्त्यावरच ‘फुटपाथ शाळा’ भरवून ही मुलं शिक्षणाशी जोडली जातात. या उपक्रमातून अनेक मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम त्यांनी केलं आहे.
advertisement
7/7
आतापर्यंत डॉ. आम्रपाली मोहिते यांनी 137 मुलांची शाळेची फी स्वतः जमा केलेल्या पैशांतून भरली आहे. विशेष म्हणजे हे पैसे त्यांनी रस्त्यावर टाळ्या वाजवून जमा केले. याशिवाय 1,087 मुलांचं शैक्षणिक पालकत्व त्यांनी स्वीकारलं आहे, तर 47 मुलांना निवासी शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे. सध्या त्या मालधक्का चौकात स्वतः मुलांना शिकवतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Teachers Day 2025: जे कुणाला नाही जमलं ते ट्रान्सजेंडर आाम्रपालीने करून दाखवलं, 1087 मुलांची झाली आई-बाबा!