Weather update : आज पुन्हा या राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस; उत्तर भारतात थंडीचा कडाका, जाणून घ्या महाराष्ट्रात काय स्थिती?
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/5

नवी दिल्ली, 19 डिसेंबर : भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आता राजधानी दिल्लीमध्ये कडक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. उत्तर- पश्चिमेकडून येणाऱ्या थंड हवेचा वेग सोमवारपासून वाढल्यानं दिल्लीमध्ये तापमानात घट झाली आहे. सोमवारी दिल्लीचं कमाल तापमान 7.1 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं होतं.
advertisement
2/5
दिल्लीप्रमाणेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह उत्तरेकडील सर्वच राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. डोंगराळ प्रदेशात बर्फवृष्टी सुरू असल्यानं त्याचा परिणाम म्हणून मैदानी प्रदेशातील तापमानात प्रचंड घट झाली आहे.
advertisement
3/5
दुसरीकडे दक्षिण भारतात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, आणि लक्षद्वीपमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये येत्या दोन दिवसांत पाऊस कमी होऊ शकतो, मात्र लक्षद्वीपमध्ये पाऊस अजूनही काही दिवस राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
4/5
उत्तर तामिळनाडू, उत्तर केरळ तसेच अंदमान आणि निकोबारच्या काही भागांमध्ये आज हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आंध्र प्रदेशचा दक्षिण किनारी भाग आणि दक्षिण कर्नाटकच्या काही भागात देखील आज हलक्या पावसाचा अंदाज आहे.
advertisement
5/5
महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास महाराष्ट्रात पुढील काही दिवस हवामान कोरडं राहणार असून, थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. राज्यातील अनेक शहरांमधील तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather update : आज पुन्हा या राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस; उत्तर भारतात थंडीचा कडाका, जाणून घ्या महाराष्ट्रात काय स्थिती?