Weather Alert: आता घरातच थांबलेलं बरं! सूर्य आग ओकणार, पश्चिम महाराष्ट्राला 24 तासांसाठी अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: मे महिन्याच्या सुरुवातीलाच पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता प्रचंड वाढली आहे. सोलापुरात उच्चांकी तापमान असून पारा 44 अंशांवर गेला आहे.
advertisement
1/7

राज्यात 2 मे रोजी अकोला येथे राज्यातील उच्चांकी 44.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा सर्वाधिक उष्ण असून इथला पारा 44 अंशांवर गेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत निरभ्र आकाश राहणार असून शुक्रवारी सरासरी तापमान 21.5 ते 44.1 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
सोलापुरातील कमाल तापमान 44.1 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 30 अंश सेल्सिअस इतके होते. पुढील 24 तास सोलापुरातील उष्णता कायम राहणार असून कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस राहिल. आकाश निरभ्र राहील.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज असून आकाश निरभ्र राहील. मागील 24 तासात साताऱ्यातील पारा 41.23 अंशांवर होता. 24 तासातील प्रचंड उकाड्यानंतर ढगाळ वातावरण सुरुवात होईल.
advertisement
4/7
पुणे जिल्ह्यात उन्हाचा चटका कायम असून मागील 24 तासात 41.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुढील 24 तासात पुण्यातील पारा 40 अंशांवर जाण्याचा अंदाज आहे. पुण्यातील आकाश मुख्यता निरभ्र राहील.
advertisement
5/7
सांगली जिल्ह्यात उन्हाची होरपळ कायम आहे. तापमानात अंशत: वाढ जाणवली. शुक्रवारी जिल्ह्यात 41 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान 24 अंश सेल्सिअस राहील. सांगली जिल्ह्यात आकाश मुख्यता निरभ्र राहील.
advertisement
6/7
कोल्हापुरातील पारा 38.5 अंशापर्यंत वाढला असून पुढील 24 तासात कोल्हापुरातील तापमानात अंशत घट राहील. कमाल 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहील. आकाश निरभ्र राहील.
advertisement
7/7
पुढील काही दिवस पश्चिम महाराष्ट्रात होरपळून काढणारे उन्ह असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. दुपारी घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आलेय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: आता घरातच थांबलेलं बरं! सूर्य आग ओकणार, पश्चिम महाराष्ट्राला 24 तासांसाठी अलर्ट