TRENDING:

Weather Alert: पावसाळा संपला, पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका की उन्हाचा तडाखा? आजचं हवामान अपडेट

Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून आता पावसाने माघार घेतली आहे. पुढील काही दिवसात पारा घसरण्याची शक्यता आहे.
advertisement
1/7
पावसाळा संपला, पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका की उन्हाचा तडाखा? आजचं हवामान
  पावसाच्या उघडिपीनंतर कोरडे हवामान, निरभ्र आकाश आणि उत्तरेकडील थंड हवा महाराष्ट्राकडे येऊ लागल्याने किमान तापमानात घट होत आहे. राज्यात हळूहळू थंडी वाढत जाणार असून, आज 8 नोव्हेंबर रोजी राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात शुक्रवारी 31.2 कमाल आणि 17.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाचा पारा नोंदविण्यात आला. आज पुणे जिल्ह्यातील कमाल तापमान 31 अंशावर तर किमान तापमान 17 अंशावर राहिल. यावेळी निरभ्र आकाश राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
3/7
सततच्या ढगाळ वातावरणानंतर सातारा जिल्ह्यात शुक्रवारी स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर आला. यावेळी 31.2 अंश सेल्सिअस कमाल आणि 18.7 किमान तापमान राहिले. आज सातारा जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमान 17 ते कमाल 29 अंश सेल्सिअस दरम्यान राहिल.
advertisement
4/7
कोल्हापूरच्या हवामानात मोठे बदल जाणवत असून हवेत गारठा वाढला आहे. दिवसाची सुरुवात साधारण 20 अंश सेल्सिअसच्या किमान तापमानाने होईल. जसजसा दिवस पुढे जाईल तसतसे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढत आहे. शुक्रवारी 33.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज कमाल तापमानात अंशत घट होऊन पारा 32 अंशावर राहिल. तसेच किमान तापमान 18 अंशावर राहिल.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 30.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज जिल्ह्यात दिवसभर निरभ्र आकाशासह कमाल तापमान 30 अंशावर राहिल. तसेच किमान तापमान 18 अंशावर राहील.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रात कोरडे हवामान, स्वच्छ आकाश असल्याने पहाटेच्या वेळी किमान तापमानात घट होऊ लागली आहे. राज्यात गारठा वाढत असून, धुक्यासह दव पडल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवसांत राज्याच्या किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याचा अंदाज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पावसाळा संपला, पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका की उन्हाचा तडाखा? आजचं हवामान अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल