TRENDING:

Rain Alert: वादळी पाऊस झोडपणार, पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट, 24 तास धोक्याचे!

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात वादळी पावसाचा जोर कायम आहे. पुढील 24 तासांसाठी पुणे, सातारा, सोलापूरला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
advertisement
1/6
Rain Alert वादळी पाऊस झोडपणार, पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट, 24 तास धोक्याचे
राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात धो धो वादळी पाऊस कोसळतो आहे. पुढील 24 तास संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/6
सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस असून पुढील 24 तास गडगडाटी वादळासह मध्यम पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यातील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस राहिल. 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाच्या वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
advertisement
3/6
सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता आहे. सोलापुरातील तुरळक ठिकाणी पूर्व मोसमी पावसाची नोंद झाली. तर पुढील 24 तासात कमल तापमान 35 अंशावर राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
4/6
कोल्हापूर जिल्ह्यात गडगडाटी वादळासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. विजांच्या कडकडाटासह ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगवान वाऱ्याची शक्यता आहे. पुढील 24 तास कोल्हापुरातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंशांवर राहील.
advertisement
5/6
पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस कोसळतो आहे. सोमवारी पुणे जिल्हात 14.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाळी हवामानाने तापमानात घट झाली असून 33 अंश सेल्सिअस तापमान राहिले. तर पुढील 24 तासात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता असल्याने पुणे जिल्ह्यासाठी सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
advertisement
6/6
वातावरणात गारवा पसरल्याने नागरिकांना उकाड्यापासून आराम मिळाला आहे. मात्र शेतीची कामे खोळंबली आहेत. पुढील काही दिवस वादळी पावसाचे वातावरण कायम असल्याने नागरिकांनी योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Rain Alert: वादळी पाऊस झोडपणार, पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट, 24 तास धोक्याचे!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल