TRENDING:

3 शुभ योग एकाच दिवशी, अमावस्येला आयुष्यात उजेड पाडण्याची सुवर्णसंधी!

Last Updated:
8 मे 2024 रोजी चैत्र अमावस्या आहे. ज्योतिषी पंडित पंकज पाठक यांनी सांगितलं की, या अमावस्येला अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. विशेषत: शनी दोष, कालसर्प दोष आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे. 
advertisement
1/7
3 शुभ योग एकाच दिवशी, अमावस्येला आयुष्यात उजेड पाडण्याची सुवर्णसंधी!
अमावस्येला स्वच्छ स्नान करून दान करणं, पितरांना नैवेद्य दाखवणं हे पुण्याचं मानलं जातंच, परंतु यंदाच्या चैत्र अमावस्येला 3 शुभ योग जुळून आल्याने दुप्पट पुण्य मिळू शकतं.
advertisement
2/7
अमावस्येला सर्वार्थ सिद्धि योग, शोभन योग आणि सौभाग्य योग जुळून येणार आहेत. सर्वार्थ सिद्धी योग दुपारी 01:35 वाजता सुरू होईल जो 9 मे रोजी सकाळी 05:30 वाजता संपेल. सौभाग्य योग 7 मेच्या रात्री 09:00 वाजता सुरू होईल आणि 8 मेच्या संध्याकाळी 05:40 वाजता संपेल. त्यानंतर शोभन योग सुरू होईल जो रात्रभर असेल. 
advertisement
3/7
या दिवशी शनी चालिसेचं पठण केल्यास शनीच्या साडेसातीसह अनेक दोषांपासून मुक्ती मिळते. शिवाय आपल्या कुंडलीतील शनीचा नकारात्मक प्रभावही कमी होतो.
advertisement
4/7
पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी भगवद्गीतेचं पठण करावं. तसंच गरजूंना दान करावं. भूकेलेल्या व्यक्तीला अन्न दिल्याने पितृदोष दूर होतोच, शिवाय घरात सुखाचं वातावरण नांदतं. 
advertisement
5/7
आपल्या परिसरात पिंपळाचं झाड असेल तर अमावस्येच्या दिवशी सकाळी या झाडाला पाणी देऊन दिवा लावा. त्यामुळे <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/astrology-says-not-to-use-the-jewelry-of-a-dead-person-l18w-mhij-1176602.html">पूर्वजांच्या आत्म्याला शांती</a> मिळते.
advertisement
6/7
तसंच कुंडलीतला कालसर्प दोष दूर करण्यासाठी या दिवशी मंदिरात जाऊन शिवलिंगावर असलेल्या सर्पाला अभिषेक करावा, त्याची विधीवत <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/astrology-news-from-may-6-to-12-the-week-is-lucky-for-whom-l18w-mhij-1176513.html">पूजा</a> करावी. त्याचबरोबर नदीत तांब्याचा सर्प अर्पण केल्यासही कुंडलीतला कालसर्प दोष दूर होतो.
advertisement
7/7
(सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
3 शुभ योग एकाच दिवशी, अमावस्येला आयुष्यात उजेड पाडण्याची सुवर्णसंधी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल